आयपीएलमध्येही वर्णद्वेषाचे वारे ; या खेळाडूने केला आरोप

08 Jun 2020 13:04:09

darren sammy_1  
मुंबई : जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाच्या मृत्यूनंतर अमेरिकेमध्ये सध्या वर्णद्वेषाचे वारे जोरात वाहत आहे. अनेक शहरांमध्ये यामुळे आंदोलने झाली आहेत. तसेच क्रीडा क्षेत्रामध्येही यामुळे कल्लोळ मजला आहे. आत हे वारे आयपीएलमध्येही असल्याचा आरोप वेस्ट इंडीज संघाचा खेळाडू डॅरेन सॅमी याने केला आहे. फक्त फुटबॉलमध्येच नाही तर क्रिकेटमध्येही खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो, असे विधान ख्रिस गेलने केले होते. तर आयसीसीने या विरोधात भूमिका घेण्याचे आवाहन डॅरेन सॅमीने केले होते.
 
 
 
 
 
डॅरेन सॅमीने आयपीएलमध्येही वर्णद्वेषाचा अनुभव आल्याचे सांगितले होते. “मी आयपीएलमध्ये हैदराबाद संघाकडून खेळत असताना मला ‘काळू’ या नावाने बोलवायचे. मला आता त्या शब्दाचा अर्थ कळतो आहे. मला आधी वाटले होते की हा कुठला तरी चांगला शब्द असेल. पण त्याचा संदर्भ लागल्यावर आणि समजल्यावर मला दुःख झाले.” असे सॅमीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हंटले आहे. या आधीही सॅमीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर फ्लॉयड यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत, क्रिकेटमध्ये आपल्यासारख्या खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना कसा करावा लागतो याबद्दल माहिती दिली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0