२४ तासांत ९ दहशतवाद्यांना कंठस्नान

08 Jun 2020 12:10:09

jk_1  H x W: 0
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या शोपियांमधील पिंजोरा भागात सोमवारी सुरक्षा दलाने चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणावरील माहितीवरून सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली. याआधी रविवारी शोपियांच्या रेबन गावात ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. पुलवामा आणि कुलगामचा हिजबुल कमांडर फारूक अहमद भट उर्फ नाली हादेखील रविवारच्या चकमकीत मारला गेला.
 
 
 
गुप्तचर यंत्रणेने गेल्या महिन्यात पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीची इशारा दिला होता. यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे. ५ जून रोजी राजौरीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले होते. काश्मीर ते शोपियांमार्गे काश्मीरला आलेल्या मुगल रोडमार्गे काश्मीरला आलेल्या या गटाचा हा दहशतवादी होता. सुरक्षा रक्षकांनुसार काश्मीर घातील सुरु असलेल्या मोहिमांपासून पळून हे दहशतवादी जम्मूत पोहचले होते. मागील काही महिन्यांपासून सुरक्षा रक्षकांनी घाटीत टॉप कंमाडरचा खात्मा केला तेव्हापासून दहशतवादी आपला तळ दक्षिण काश्मीरमधून राजौरी आणि पुंछमध्ये हलवत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0