शिवसेनेची केंद्रावर अर्थहीन टीका : फडणवीस

    दिनांक  07-Jun-2020 19:49:35
|
DF _1  H x W: 0
मुंबई : शिवसेना केंद्र सरकावर सातत्याने करत असलेल्या टीकेला काहीच अर्थ नाही, तत्त्व नाही आणि मूल्यही नाही, असली टीका अनाठायी आहे, असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या डिजिटल पत्रकार परिषदेत शिवसेनेवर टीका केली. केंद्राने घाईनेच लॉकडाऊन केला, असा आरोप आता केला जात आहे. याबद्दल त्यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला. 
 
 
शिवसेना आमच्यासोबत पाच वर्षे सत्तेत होती तेव्हाही त्यांनी विरोधी पक्षाचेच काम केले. बरे एका भूमिकेवर ते ठाम राहिले तर ठीक होते. पण रोज भूमिका बदलायाची हे त्याचं धोरण, एक दिवस म्हणायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत. काही दिवसांनी मोदींवर टीका करायची, एकदा राज्यपालांना नाव ठेवायची, नंतर कुनिर्सात करायचा. त्यामुळे फक्त टीकेसाठी टीका करायची असे शिवसेनेचे धोरण आहे. त्या टीकेला अर्थ, तथ्य आणि मूल्य नाही, असे फडणवीस म्हणाले. 
राज्यातील परिस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले, "आज राज्यात कोरोनामुळे स्थिती वाईट होत चालली आहे. मात्र जेवढ्या चाचण्या व्हायला हव्यात तेवढ्यात होत नाहीत. देशाच्या आधी लॉकडाऊन पुकारला तो महाराष्ट्राने घाई कुणी केली? देश आम्हाला फॉलो करतो आहे अशा जाहिराती तेव्हा केलव्या आणि आता यांना त्याचा विसर पडला. त्यामुळे केंद्राने लॉकडाऊन करताना घाई केली अशी ओरड केली जात आहे."आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.