युथ काँग्रेसकडून तिरंग्याचा अवमान, तक्रार दाखल

    दिनांक  07-Jun-2020 14:26:42
|
inc _1  H x W:

नवी दिल्ली : दिल्लीचे भाजप प्रवक्ते तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी काँग्रेस युथतर्फे तिरंग्याचा अवमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दिल्ली पोलीसांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. युथ काँग्रेसच्या ट्विटरवरून ती आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यात आली आहे. मात्र, ताजिंदर बग्गा यांनी हे ट्विट पोस्ट करत जाहीर माफी मागण्याचे आवाहन काँग्रेसला केले आहे.युथ काँग्रेसने तिरंग्यावर कोरोना विषाणूचे प्रतिकात्मक चित्र तयार करत ट्विट करत देश कोरोनाशी लढण्यात असमर्थ ठरत आहे, असे म्हटले. त्यात एका व्हीडिओमध्ये तिरंग्यावर कोरोना विषाणू अवमानकारकरीत्या दाखवण्यात आले होते. देशाच्या झेंड्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रीय ध्वजाला अशाप्रकारे अवमानित करणे हा एक दंडनीय अपराथ आहे. या अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यूथ काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.