सीमावादावर तोडगा नाही मात्र, भारत-चीन संवाद कायम राहणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2020
Total Views |
indo-china _1  
 
 

तणावत्मक स्थिती हाताळण्यासाठी चीन सकारात्मक


नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये झालेल्या सैन्य कमांडर स्तरावरील बैठकीत सध्या सुरू असलेल्या सीमावादावर कुठलाच तोडगा निघाला नाही. चुशुल-मोल्डो या भागात सहा तास ही चर्चा झाली. मात्र, चीनने आपले सैन्य पूर्वीच्या ठिकाणी हलवण्यास नकार दिला आहे. दोन्ही सैन्यदलांनी हा मुद्दा सोडवण्यासाठी सैन्यस्तरावर संवाद ठेवणार असल्याचे म्हटले आहे. 

 
उच्चस्तरीय बैठकीतून अपेक्षा


चीनी सैनिकांच्या घुसखोरी संदर्भात ६ जून रोजी उच्च स्तरीय बैठक घेण्यात आली. भारतीय सैन्यदलाचे १४ कोअर कमांडर लेफ्टनंट जन हरिंदर सिंह आणि चीनच्या दक्षिणी शिचियांग मिलिट्री डिस्ट्रीक्ट कमांडर मेजर जनरल लियू लीन यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेत भारतासाठी कुठलेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. सैन्य कमांडर्सच्या बैठकीपूर्वी दोन्ही देशांमद्ये रणनिती स्तरावर संयुक्त सचिव स्तर अधिकाऱ्यांचीही बैठक झाली होती.

 
 
चर्चा सुरू राहणार 


चुशूल-मोल्डो या भागात सैन्य कमांडर्समध्ये झालेल्या चर्चेत उच्च स्तरीय बैठकीबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने परिपत्रक जाहीर केले आहे. दोन्ही देशांची चर्चा सकारात्मक वातावरणात झाली. दोन्ही देश सध्याची तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहमत आहेत. भारत-चीन याबद्दल चर्चा करण्यासाठी तयार आहेत.

 
भारत-चीन संबंधाची ७० वर्षे


नियंत्रण सीमारेषेवर एकाच वेळी विविध ठिकाणी तणाव निर्माण करणारी स्थिती होती. लडाख आणि गलवान घाटी, पँगोंग सरोवराच्या ठिकाणी एका महिन्यांहून जास्त वेळ हा तणाव सुरू आहे. भारत-चीन संबंधांच्या ७०व्या वर्षालाच ही परिस्थिती उद्भवली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या एका वक्तव्यानुसार, दोन्ही देश ७०व्या वर्षानिमित्त सध्याच्या तणावात्मक परिस्थितीला हाताळण्यासाठी सकारात्मक आहेत.


गलवान घाटीत दोन्ही देशांचे सैनिक तळ ठोकून


भारतीय सैनिकांसह चीनी सैन्याने केलेल्या झटापटीमुळे दोन्ही देशांच्या सैन्यदलांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सिक्किमच्या नाकुलासह पँगोग सरोवर आणि लडाखच्या गलवान घाटी येथे झालेल्या तणावामुळे दोन्ही देशांचे सैन्य इथे तळ ठोकून उभे आहे. दोन्ही सैनिक आपापल्या सीमारेषेच्या आत आहेत. भारतीय रस्ते आणि सैन्याच्या विविध परीयोजनांवर चीनने आक्षेप घेतला आहे.









@@AUTHORINFO_V1@@