राज्यात ३००० पोलीसांना कोरोना

07 Jun 2020 18:16:19
ANil Deshmukh _1 &nb






पुणे : लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत तब्बल तीन हजार पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. एकूण तीस पोलिसांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांवर चांगल्या उपचार करण्याची सूचना दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यातील कारागृहातून आतापर्यंत दहा हजार हजार कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्यात आलो आहे. तर उर्वरित कैद्यांनाही लवकरच सोडले जाणार आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.


कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी तीन महिन्यांपासून पोलीस दल अहोरात्र तैनात आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावले आहे. पोलीस दलात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता ५० वर्षांवरील २३ हजार पोलिसांना पोलीस ठाण्यातच काम तर ५५ वर्षांवरील एकूण १२ हजार पोलीसांना खबरदारी म्हणून घरीच थांबण्याचा सूचना दिल्या आहेत. दिलासादायक म्हणजे या सर्वांचा ही सुट्टी भरपगारी मिळणार आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0