दिलासादायक ! धारावीत कोरोनावर नियंत्रण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2020
Total Views |

dharavi_1  H x



मुंबई :
योग्य उपचारपद्धतीमुळे धारावीत कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. रोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत घट झालीच, पण ३० मेपासून मृत्यूचे प्रमाणही शून्यावर आले आहे.



आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी कोरोनाचे केंद्र बिंदू ठरत होती. परंतु घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी, योग्य उपचारपद्धती, क्वारंटाईन सेंटर मध्ये खेळीमेळीचे वातावरण यामुळे आपण ठीक होऊन घरी जाणार, असा आत्मविश्वास रुग्णांमध्ये वाढला आहे. एक हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर रोज १०० पर्यंत मिळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्याही २५ वर आली आहे. विशेष म्हणजे ३० मे पूर्वी धारावीत मृतांचा आकडा ७१ वर पोहोचला. परंतु ३० मे नंतर एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. त्यामुळे रुग्णांचा आत्मविश्वास, योग्य उपचारपद्धती यामुळे रुग्ण बरा होऊन घरी जाण्याचे प्रमाण वाढल्याचे जी उत्तर विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.


धारावीत बुधवारी १९, गुरुवारी २३ रुग्ण सापडले होते. शुक्रवारी १७ रुग्ण सापडल्याने येथील रुग्णांची एकूण संख्या १८८९ झाली आहे. तर दादरमध्ये ७ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. दादरमधील कोरोना रुग्णांची संख्या आता ३७४ झाली आहे. माहीममध्येही २४ रुग्ण सापडल्याने माहीममधील कोरोना रुग्णांची संख्या ६०६ झाली आहे. धारावी, दादर आणि माहीममध्ये शुक्रवारी एकूण ४८ रुग्ण सापडल्याने या तिन्ही भागातील एकूण रुग्णसंख्या २८६९ झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@