कोरोनायोद्ध्यांचा बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2020
Total Views |

corona warriors_1 &n



मुंबई :
कमी मनुष्यबळात कोरोना रुग्णांना चांगली सेवा देणाऱ्या कोरोनायोद्ध्यांचे मनोधैर्य वाढविण्याऐवजी, व्हिडीओ व्हायरल करून त्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांना दिले आहे. मुंबई महानगरपालिका रुग्णालय, आरोग्य खात्यासहित अत्यावश्यक सेवेतील सर्व संवर्गातील कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करीत आहेत. मात्र रुग्णांची सेवा करीत असतानाच प्रशासनाच्या आकडेवारीनुसार सुमारे १६०० हून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित झालेले असून ४० कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे.रिक्त पदे न भरण्याच्या प्रशासनाच्या धोरणापायी आतापर्यंत आस्थापनेवरील सर्व संवर्गातील ५६ हजारांहून अधिक पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत.




एवढेच नव्हे तर, रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी एमआरआय, सिटी स्कॅन, एक्सरे, ईसीजी आदी नवनवीन मशीन आणल्या. वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन आयसीयू, ऑपरेशन थिएटर असे अधिक विभाग सुरू करण्यात आले. परंतु याठिकाणी लागणारे मनुष्यबळ देण्यात आलेले नाही. तसेच सेवानिवृत्तीमुळे होणारी रिक्त पदेही भरली गेली नाहीत. त्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अधिक ताण पडत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असताना, मुंबई महानगरपालिका रुग्णालय, आरोग्य खात्यासहित कामगार, कर्मचारी परिचारिका, डॉक्टर्स व इतर खात्यातील कर्मचारी कोरोनाला हरवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत आहेत. मात्र त्यांचे मनोबल वाढविण्याऐवजी बदनामी करून त्यांचे खच्चीकरण करण्यात येत आहे.



आपल्या अधिकाऱ्यांकडून ७० टक्के कर्मचारी कामावर हजर नाहीत म्हणून सांगितले जाते, परंतु आस्थापनेवरील एकूण पदाच्या ४० टक्के पदे रिक्त आहेत. शिवाय ५५ वर्षांवरील, आजारी, दिव्यांग, गरोदर महिला कर्मचाऱी, कोरोनाबाधित कर्मचारी, क्वारंटाईन कर्मचारी, कंटेन्मेंट झोनमध्ये असलेले कर्मचारी हे कामावर हजर राहू शकत नाहीत. या सर्व बाबींचा विचार केला तर ७० टक्के कर्मचारी जाणूनबुजून कामचुकारपणा करीत नसून वरील सर्व बाबींमुळे कर्मचारी अपुरे पडत आहेत. महापालिकेने वेळोवेळी पदे भरली असती आणि पूर्वीप्रमाणे रजा राखीव पदे आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या ३० टक्के ठेवली असती तर आज या महामारीला मनुष्यबळ अपुरे पडले नसते, याचाही सारासार विचार करणे आवश्यक आहे, याचीही जाणव प्रशासनाला करून देण्यात आली आहे. रुग्णालय विभागातील सर्व संवर्गातील कर्मचारी प्राण पणाला लावून काम करत असताना त्यांची आणि महापालिकेची बदनामी करणारे व्हिडिओ व्हायरल करणारे कोण आहेत याचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शेवटी म्युनिसिपल मजदूर युनियनने केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@