एसबीआयला तिमाहीत ३,५८१ कोटींचा शुद्ध नफा

05 Jun 2020 19:50:39
SBI_1  H x W: 0




मुंबई : देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेला (एसबीआय) सुरू आर्थिक वर्ष जानेवारी मार्च २०२० या तिमाहीत ३,५८१ कोटींचा शुद्ध नफा झाला. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत हा नफा ८३८ कोटी इतका होता. त्यात यंदा चौपट वाढ झाली आहे. शुक्रवारी कंपनीने ही माहिती जाहीर केली. दरम्यान, दिवसभरात एसबीआयचा शेअर आठ टक्क्यांनी वाढून १८७ रुपयांवर कामगिरी करत होता. 


बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 'संपूर्ण आर्थिक वर्षांदरम्यान, निव्वळ नफा हा १४ हजार ४८८ कोटी इतका आहे. वार्षिक आकडेवारीनुसार बँकेच्या नफ्यात एकूण १५ टक्के वाढ झाली आहे. बँकेच्या इतिहासातील सर्वाधिक नफा मानला जात आहे. संपूर्ण वर्षभरादरम्यान नफा ६८ हजार १३३ कोटी इतका झाला आहे. दरम्यान, यावर्षभरापूर्वी हा लाभ ५५ हजार ४३६ कोटी इतका होता. वर्षभरात निव्वळ व्याज मिळकतीत ११.०२ टक्के वाढ झाली आहे. व्याज मिळकतीत २३ टक्क्यांइतकी वाढ झाली. 
बँकेतील ठेवी ११.३४ टक्कांनी वाढल्या आहेत. एकूण ठेवींची रक्कम ३२.४१ लाख कोटी रुपये झाली आहे. चालु खात्यांमध्ये ७.५६ टक्के तर बचत खात्यांमध्ये ९.९९ टक्के वृद्धी झाली. क्रेडीट ग्रोथमध्ये ५.६४ टक्के वाढ झाली आहे. रिटेल क्षेत्राचा हिस्सा एकूण १५.४ टक्के इतका आहे. परदेशातील एकूण व्यावसायाचे योगदान १८.०५ टक्के इतके आहे. 



एनपीएमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. एकूण कर्जापैकी २२ टक्के हे गृहकर्जवाटप आहे. त्यात १३.८६ टक्के वाढ झाली आहे. असेट क्वालिटी बँकेचे शुद्ध एनपीए एकावर्षापूर्वी तुलनेत ७८ बीपीएसने कमी होऊन २.२३ टक्क्यांवर राहणार आहे. या काळात ग्रॉस एनपीए ६.१५ टक्के होता. वर्षभरात तो १३८ बीपीएस म्हणजे १.३८ टक्के कमी झाला. बँकेकडे कॉर्पोरेट कर्ज ग्राहकांपैकी ३८.९ टक्के ग्राहक पीएसयू आणि सरकारी विभागाचे आहेत. ६०.८ टक्के कर्ज हे रिटेल आणि वैयक्तीक प्रकारचे आहे. ९५ टक्क्यांहून विनातारण कर्ज हे पीएसयू विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.






Powered By Sangraha 9.0