सीता मातेविषयी आक्षेपार्ह टिप्पणी ; 'गो एअर'चा कर्मचारी निलंबित

    दिनांक  05-Jun-2020 15:50:49
|

go air_1  H x W


नवी दिल्ली
: खासगी विमान कंपनी गोएअरमधील कर्मचाऱ्याला सीता मातेविषयी  आक्षेपार्ह भाष्य केल्याबद्दल कंपनीने निलंबित करत कारवाई केली आहे. कर्मचारी आशिफ खान याने ट्विटरवर सीता मातेविषयी आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या ज्यानंतर बॉयकॉट गोएयर (# boycottgoair) ट्विटरवर ट्रेंड होण्यास सुरुवात झाली.


लोकांमधून कारवाईची मागणी


आसिफ खान याच्या या टिप्पणीनंतर अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी गोएअरला टॅग करत असिफ याच्यावर कारवाईची मागणी केली होती. सोनम महाजन यांनी गोएयरला ट्विटरवर टॅग केले होते की, 'आशिफ खान आपला कर्मचारी आहे का? त्याच्या बायोमध्ये म्हणल्याप्रमाणे जर तो तुमचा कर्मचारी असेल आणि तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नसाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही हिंदू धर्माबद्दल द्वेषाचा प्रचार करीत आहात.' अनेकांनी ट्विट करत म्हंटले की, गोएअरने त्यांच्या कर्मचार्‍यांला निलंबित केले नाही तर ते यापुढे गोएअरवरून प्रवास करणार नाहीत.


गोएअरने कारवाई करताना म्हंटले ,


 गोएअरने आशिफला कंपनीतून हटविण्याची कारवाई केल्याची माहिती दिली. ट्विटरवर माहिती देताना कंपनीने लिहिले की, 'गोएअरच्या झिरो टॉलरन्स पॉलिसीनुसार गोएअरच्या कर्मचार्‍यांना कंपनीत नियुक्तीचे नियम,अटी व धोरणे पाळणे अनिवार्य आहे. सोशल मीडियावरील वर्तनाचा देखील यात समावेश आहे. एखाद्या व्यक्तीचे किंवा कर्मचाऱ्याचे वैयक्तिक दृष्टिकोन कंपनीशी संबंधित नाहीत. प्रशिक्षणार्थी प्रथम अधिकारी आशिफ खानचा करार तत्काळ रद्द करण्यात येत आहे.'


आशिफ खानने प्रोफाइल केले डीऍक्टिव्हेट


गोएअरच्या या घोषणेनंतर सोनम महाजन यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, 'माझ्या ट्विटनंतर आशिफ खानने त्यांचे प्रोफाइल निष्क्रिय केले आहे. पण आनंद आहे की गोएअरने त्याच्यावर कारवाई केली.'
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.