मुंबईकरांनो आजपासून 'या' गोष्टी होणार चालू!

    दिनांक  05-Jun-2020 10:37:50
|

mumbai_1  H x W
मुंबई : तब्बल अडीच महिन्यांनंतर मुंबई हळूहळू पूर्व पदावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ धोरणानुसार आजपासून महाराष्ट्रात अनलॉकडाउन १.० ला सुरुवात होत आहे. कोरोनामुळे स्तब्ध झालेली मुंबई आता काही अटी पळून पुन्हा एकदा चालू करण्याची तयारी चालू झाली आहे. शुक्रवार पासून काही बाजारपेठ, दुकाने सुरु होणार असली तरी काही नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
कुठे काय होणार चालू?
 
> ‘एमएमआर’मध्ये आत कुठल्याही परवानगीची गरज असणार नाही. म्हणजेच, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईँदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ येथे नागरिकांना आता विनापरवानगी प्रवास करता येणार आहे.
> पहाटे ५ पासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत नागरिकांसाठी मैदाने आणि उद्याने खेळी ठेवण्यात येणार आहेत. यावेळेमध्ये नागरिकांना व्यायाम, जॉगिंग, सायकल चालवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र कुठल्याही प्रकारचे ओपन जिम चालू करण्यास परवानगी नाही.
> महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी दुकाने सम-विषम पद्धतीने चालू राहतील. यावेळी वाहतूक व्यवस्था आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे.
> कपड्यांच्या दुकानांमध्ये ट्रायल रूम चालू करण्याची मुभा नसेल, शिवाय कोणत्याही प्रकारे कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगी नसेल.
> ७ जूनपासून वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे
> शैक्षणिक संस्थांना त्यांचे फक्त कार्यालयीन काम चालू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
> टॅक्सी, कॅब यांना अत्यावश्यक सेवेकरिता १ + २ प्रवासी, रिक्षासाठी १+२ प्रवासी, चारचाकीसाठी १+२ प्रवासी तर मोटार सायकलवर केवळ चालकास परवानगी राहणार आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.