“अजून घ्या शिवसेनेला डोक्यावर”

    दिनांक  05-Jun-2020 16:42:44
|

nilesh rane_1  
 
 
मुंबई : गुरुवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये महाराष्ट्रामधील अनेक समुद्र किनारी असलेली गावे कचाट्यात सापडली. बऱ्याच गावांचे लाखोचे नुकसान झाले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिबाग येथे भेट दिली आणि रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी नुकसानभरपाई जाहीर केली. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी आक्षेप घेत ‘सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्येसुद्धा अनेक गावांचे नुकसान झाले, पण तिकडे त्यांना वेळ देता आला नाही.’ अशी टीका केली.
 
 
 
 
 
निलेश राणे यांनी म्हंटले आहे की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी नुकसानभरपाई जाहीर केली. पण, त्यांनी रायगडमध्ये फक्त एक-दोन ठिकाणी पाहणी केली आणि ते मुंबईत परतले. सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये सुधा अनेक गावे आहेत जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण, ती पाहणी करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. अजून घ्या शिवसेनेला डोक्यावर.” अशी खंत व्यक्त केली. यापूर्वीही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांवर त्यांनी टीका केली होती.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.