...तर आयपीएल देशाबाहेर ?

05 Jun 2020 16:06:51

ipl_1  H x W: 0
मुंबई : सध्या देशामध्ये परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासारही परिस्थिती देशामध्ये नाही. अशामध्ये आयपीएलच्या १३व्या हंगामाचे काय होणार? बीसीसीआय काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या बीसीसीआय याबाबत अनेक पर्यायांचा विचार करत आहे. यामध्ये तशी गरज पडलीच तर शेवटचा पर्याय म्हणून आयपीएल भारताबाहेरही खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.
 
 
बीसीसीआयच्या एका सुत्राने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ‘बीसीसीआय सर्व पर्यायांची चाचपणी करत आहे. जर आयपीएल देशाबाहेर खेळवण्याच्या पर्यायाचा विचार केला तर तो पर्यायही खुला आहे. पण, हा अंतिम पर्याय असेल. यापूर्वीही देशाबाहेर आयपीएल खेळवण्यात आली होती. गरज पडली तर आताही हा निर्णय घेता येईल.’ अशी माहिती दिली.
 
 
आयपीएल भारताबाहेर पहिल्यांदा २००९ला खेळवण्यात आली होती. त्यावेळी आयपीएल दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली होती. त्यानंतर २०१४ची आयपीएल भारत आणि युएईमध्ये खेळवण्यात आली होती. दरम्यान आयसीसीची १०जूनला टी-२० विश्वचषक स्पर्धेसंदर्भात बैठक होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचाशाकाबाबत कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत बाकीच्या कोणत्याही गोष्टीवर अंतिम निर्णय होणार नाही.
Powered By Sangraha 9.0