'हीच ती वेळ' ; संजय राऊत यांनीच आता मंत्र्याना सांगावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2020
Total Views |

ashish shelar_1 &nbs



मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याची घोषणा केली होती. मात्र अंतिमच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची की नाही ते विद्यापीठ कायद्याच्या आधारे ठरवले जाईल. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे,' असे म्हणत राज्यपाल कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर आज शिवसनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून भूमिका मांडण्यात आली आहे.यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार ऍड. आशिष शेलार यांनी सामनाच्या अग्रलेखाबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे आभार मानत सेनेच्या मंत्र्याना निर्णय घेण्याची विनंती केली आहे.





आशिष शेलार ट्विटमध्ये म्हणतात, " 'पदवी अंतिम वर्ष परीक्षा आणि ATKT असलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक आरोग्याची काळजी करणारी भूमिका आम्ही मांडली. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही विद्यार्थ्यांची काळजी अग्रलेखात अधोरेखित केली", असे म्हणत शेलार यांनी राऊत यांचे आभार मानले.परंतु उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत योग्य वेळी निर्णय घेऊ असे सांगत आहेत. त्यामुळे प्रश्न लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा असल्यामुळे संजय राऊत यांनीच मंत्र्यांना सांगावे की, निर्णय घेण्याची 'हीच ती वेळ' असे म्हणत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.



तत्पूर्वी, सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन झाला का? तरुणांच्या माथी "जळीत बीए" प्रमाणे "कोरोना ग्रॅज्युएट" बिरुदावली लागणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात अशा भयगंड निर्माण केलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधीत भाजपाचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी राजभवनवर जाऊन म्हणून राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली होती. शासनाने पदवी अंतीम वर्षांची परिक्षा न घेता सरासरी गुण देण्याचा व गुणसुधार कार्यक्रमात ऐच्छिक जाण्याचा तीन महिन्या नंतर त्यांची परिक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला तो सर्वसमावेशक विचार करुन घेतला का असा सवालदेखील आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

@@AUTHORINFO_V1@@