देशावर येणाऱ्या प्रत्येक संकटात 'भाजयुमोचे सैनिक' लढा देण्यास सज्ज

    दिनांक  04-Jun-2020 23:01:47
|

poonam mahajan_1 &nb


भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष
पूनम महाजन यांनी व्हर्च्युअल रॅलींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संबोधित केले
.मुंबई :
मोदी सरकारच्या २.०च्या वर्षपूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात भाजपच्या व्हर्च्युअल रॅलींचे आयोजन करण्यात येणार आहे. या संपूर्ण वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामाची व कोरोनाच्या या लढ्यात केलेल्या कार्याची माहिती या रॅलीतून लोकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. या रॅलीची सुरुवात आजपासून भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनम महाजन यांनी केली. गुरुवार दि.४ रोजी पूनम महाजन यांनी व्हर्च्युअल रॅलींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संबोधित केले. ही रॅली सुमारे अडीच लाख लोकांनी बघितली.

त्या म्हणाल्या, समाज,स्वास्थ, संस्था, सकारात्मकता, सरकार या ५ 'स'सोबत भारत प्रगती साधत आहे. पहिला 'स' म्हणजे 'समाज'. समाजाकडून आपल्याला अपेक्षा आहे ती या लढाईला संघटितपणे एकत्रित येत हरविण्याची.यात सोशल डिस्टंसिंग, स्वत्च्छता यांसारख्या नियमांचे पालन करणे याचा समावेश होतो. दुसरा 'स' 'स्वास्थ' यात आपले आणि आपल्या कुटुंबियांचे आरोग्य राखणे याबाबत जागरूक राहणे. कोरोनाच्या या संकटात आपल्याला कोरोना बाधितांना समाजातून अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तिसरा 'स' आहे 'संस्था'.  भाजपने या संकटात लढा देत जनतेपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य केले. आज जागतिक पातळीवर आपल्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्या म्हणाल्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गरजूंपर्यंत धान्य, जेवण, अन्न, औषधी अँम्बुलन्स, क्वारंटाईन सेंटर याठिकाणी मदतकार्य पोहोचविले आरोग्यसुविधा पोहोचविल्या.रोटरी क्लब, लायन्स क्लब अनेक छोट्या छोट्या संस्थांनी एकत्र येत मानवतेचे उत्तम प्रदर्शन याकाळात केले.
त्या पुढे म्हणाल्या, यातील चौथा 'स' आहे 'सरकार'. ज्या सरकारला आपण मत दिलंत, ज्या सरकारकडून तुम्ही अपेक्षा ठेवल्या त्यांनी देखील नागरिकांच्या अपेक्षापूर्तीवर भर दिला. महिला जनधन खात्यात हजारो रुपये जमा करणे असो, उज्वला योजनेतून  गॅस सिलेंडर मोफत देणे असो, सॅनिटायझेशन व मास्कचा पुरवठा असो, पीपीई किटची सुविधा असो, गरजूना मोफत अन्न धान्य, मजुरांना त्यांच्या गावी राज्यात पाठविणे, श्रमिक रेल्वेची सुविधा असो, परदेशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्याची जबाबदारी , शेतकऱ्यांसाठी कर्जपुरवठा, शेतमालाची खरेदी, लघु, मध्यम उद्योग, वन नेशन वन रेशन सुविधा, पीएम केअर मधून सर्व राज्यांना आपत्कालीन निधी किंवा परदेशात औषधी पुरवठा असो या सर्वच स्तरावर भाजप सरकार काम करत आहे.
 


पूनम महाजन या पुढे म्हणतात, आपल्याला भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देणारा महत्वपूर्ण 'स' म्हणजे सकारात्मकता.  समाज, संस्था, स्वास्थ आणि सरकार यांना सोबत घेत आपण या लढाईत उतरताना आपल्याला सकारात्मक असणे गरजेचे आहे. मी सर्व देशवासियांना सांगू इच्छिते की, ही संकट पूर्ण जगावर आहे.आपल्याला अजून खूप मोठा लढा द्यायचा आहे त्यामुळे आपल्यात सकारात्मकतेचा दृष्टी गरजेची आहे.


पूनम महाजन यांनी पंतप्रधान मोदींनी कोरोनाची परिस्थिती योग्यरीतीने हाताळत जागतिक पातळीवर भारताचे महत्व अधोरेखित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्या म्हणतात, भारतातील लॉकडाऊनचे संपूर्ण जगभरातून स्वागत झाले आहे. देशाला कोरोनाच्या प्रकोपातून वाचविण्यात लॉकडाऊनने मोठी मदत झाली. पंतप्रधान मोदींनी योग्य वेळी लॉकडाऊन केले म्हणून आज आपण देशाला वाचवू शकलो. भारतीय नागरिकांचा जीव वाचवत आज देश अनलॉक होण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत आहे. लॉकडाउनच्या काळात आलेल्या अनुभवनातून आपण पुढे पाऊले उचलणे गरजेचे आहे. जागतिक आपत्तीचे रूपांतर संधीत करण्याची वेळ भारताकडे आहे. आज संपूर्ण जगाचे भारताकडे लक्ष आहे. आज प्रत्येक देश भारताकडे मैत्रीचा हात देत आहे ते केवळ पंतप्रधान मोदींच्या वैश्विक नेतृत्वामुळेच.पुढे पूनम महाजन यांनी भाजयुमोच्या कोरोना लढ्यातील कार्याची माहिती दिली. रक्तदान करण्यासाठी हेल्पलाईन, गरजुंना अन्नधान्य पुरवठा, लवारीस मृतदेहांच्या अंतिम संस्कारांच्या कार्यात देखील भारतीय जनता युवा मोर्चा मदत करेल असे त्यांनी यावेळी सांगितले. येणाऱ्या काळात तरुणाईवर मोठी जबाबदारी आहे. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चातील कार्यकर्त्याना आवाहन केले की, येणाऱ्या काळात केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला मजबुती देत या सर्व योजनांशी युवकांना जोडण्याची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक जिल्ह्यात भाजयुमोचा 'सोल्जर' म्हणजे 'सैनिक' हेल्पलाइनच्या माध्यमातून या योजनांची माहिती तरुणांपर्यंत पोहोचवेल. देशावर येणाऱ्या प्रत्येक संकटात भाजयुमोचे सैनिक लढा देण्यास सज्ज असतील असे आश्वासन देखील यावेळी दिले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.