सोनू सूद पुन्हा ठरला ‘देवदूत’!

04 Jun 2020 19:30:50

Sonu sood_1  H


निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना सोनूने केली मदत!


मुंबई : लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था करणाऱ्या सोनू सूदने आणखी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. निसर्ग चक्रीवादामुळे धोका निमार्ण झालेल्या क्षेत्रातील २८ हजार लोकांना त्याने मदत केली आहे. सोनू सूदने निसर्ग चक्रीवादाळामुळे प्रभावित झालेल्या लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. तसेच त्यांना अन्न-पाणी देखील पुरवले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून पुन्हा एकदा त्याचे कौतुक होत आहे.


‘प्रत्येकजण आज या कठीण परिस्थितीचा समाना करत आहेत. या भयंकर परिस्थितीत सर्वांनी एकमेकांना साथ देणेचच योग्य आहे. यामुळे मी आणि माझ्या सहकाऱ्यांने समुद्र किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या २८ हजार नागरिकांना जेवण वाटप केले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे जवळच्या शाळेत आणि महाविद्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे. आत ते सुरक्षित आहेत’, असे सोनू सूद म्हणाला आहे. याआधी सोनू सूदने काही दिवसांपूर्वी कर्नाटक उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या प्रवासी मजूरांच्या घरी जाण्याची व्यवस्था केली आहे.
Powered By Sangraha 9.0