लडाखमधून चीनची सावध माघार

04 Jun 2020 14:09:15
Ladakh_1  H x W




लडाख : जगाला कोरोना महामारीत ढकलत चीनने शेजारीला देशांच्या सीमांवर कुरापती सुरू केल्या. भारताविरोधातही लडाखमध्ये चीनी सैनिकांनी मुजोर वर्तन सुरूच ठेवले. महिनाभरापासून लडाखच्या सीमांवर तणाव सुरू आहे. भारत सरकारनेही याचे जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशांचे सैन्य मोठ्या प्रमाणावर इथे तैनात झाले आहे. मात्र, आता चीनकडून नरमाईची भूमीका घेतली असल्याचे समजते आहे. 
नियंत्रण रेषेवर संघर्ष सुरू असलेल्या काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैनिक काहीसे मागे हटले आहेत. गालवान व्हॅली चीनी सैनिक दोन किमी तर भारतीय सैन्य एक किमी अंतरावर मागे गेले आहे. दोन्ही देशांच्या लेफ्टनंटची सहा जून रोजी चर्चा होणार आहे. लडाखमध्ये दोन्ही देशांच्या तणाव निवारणासाठी यापूर्वीही चर्चा झाल्या होत्या मात्र, त्या निष्फळ ठरल्या आहेत. 
चीन सैनिकी ताकद लावून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या लढाऊ विमानांचा सरावही या भागात सुरू असतो. भारतानेही याला चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. १४ कॉपर्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह चीनी लेफ्टनंटसह चर्चा करण्याची शक्यता आहे. पँगाँग टीएसओ तलावानजीक चीनी सैन्याने तळ ठोकला आहे.
Powered By Sangraha 9.0