दहशतवादी हल्ल्यांनंतरही अखंड अमरनाथ यात्रेला कोरोनामुळे खंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2020
Total Views |
Shivling _1  H





श्रीनगर : अमरनाथ गुफेचे पहीले छायाचित्र जाहीर झाले आहे. अमरनाथ गुफेच्या बाजूला पूर्वीसारखा बर्फाच्छादीत भाग तयार झाला आहे. हे छायाचित्र कुणी टीपले याची माहिती समजू शकलेली नाही. २२ एप्रिल रोजी अमरनाथ श्राईन बोर्डातर्फे एका परीपत्रकाद्वारे यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २३ जून रोजी पुन्हा यात्रा सुरू होणार का याबद्दल निर्णय राखीव ठेवण्यात आला आहे. 


श्राईन बोर्डाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा १५ दिवसच सुरू ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. या यात्रेचे स्वरुप बालाटाल मार्गे असेल. पारंपारिक रस्ता हा पहलगाम, चंदनवाडी, शेषनाग, पंचतरणी इथून जातो. अमरनाथ यात्रा होणार की नाही याबद्दल २२ एप्रिल रोजी जम्मूतील राजभवनात झालेल्या चर्चेत संभ्रम होता. यात्रा रद्द झाल्याचा निर्णयाबद्दल परिपत्रक काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा ते परिपत्रक मागे घेण्यात आले. त्यानंतर पुन्हा यात्रा होईल की नाही याचा निर्णय राखीव ठेवला असल्याचे सांगण्यात आले. 


जम्मू कश्मीरमध्ये ४०७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३५१ हे केवळ काश्मीरमधील आहेत. या यात्रेची नोंदणी १ एप्रिलपासून केली जाणार होती. त्यानंतर बर्फ हटवण्याचे काम सुरू झाले. अजूनही या भागात बरेच काम बाकी आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव यात्रा रद्द करण्यात आली होती. यात्रा थांबेपर्यंत यंदा ३.५ लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे. 


१९९४मध्ये उल अंसार या दहशतवादी हल्ल्यात दोन भाविकांचा मृत्यू झाला. १९९५ मध्ये हरकल उल असांरचे तीन हल्ले झाले होते. अमरनाथ यात्रेत कित्येकवेळा दहशतवाद्यांनी आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला मात्र, ही यात्रा आजवर अखंड सुरू आहे. ऑगस्ट २०००मध्ये पहलगाम बेस कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात ३० भाविकांचा मृत्यू झाला होता. २००१मध्ये शेषनाग येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी तीन पोलीसांसह १२ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. २००२मध्ये सलग तिसऱ्या वर्षी झालेल्या हल्ल्यात दहा भाविकांचा मृत्यू झआला होता. तीन वर्षांपूर्वी अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला तिथे आठ लोकांचा मृत्यू झाला. यात १८ जण जखमी झाले. इतक्या हल्ल्यांनंतरही यात्रेतील भाविकांचा ओघ आणि गर्दी कायम राहिली आहे. 





           वर्ष          यात्रेकरू 
२०१९    ३.५० लाख    (२ ऑगस्ट यात्रा बंद करण्यापूर्वी)

२०१८     २.८५ लाख

२०१७    २.६० लाख

२०१६    २.२० लाख

२०१५    ३.५२ लाख





@@AUTHORINFO_V1@@