मध्यमवर्गीय भरडला जातोय !

30 Jun 2020 13:59:54
taxi _1  H x W:



कोरोना विळख्यात खर्‍या अर्थाने भरडला नव्हे चिरडला जातोय तो प्रामाणिकपणे सर्व कर भरणारा नोकरदार, मध्यमवर्गीय त्याला ना कसली मदत, सवलत. व्यवसाय, नोकरीवर झालेला परिणाम, आर्थिक बजेट पुर्णपणे विस्कटलेले आणि त्यात अव्वाच्या सव्वा बिल लावणारी हॉस्पिटल, अव्वाच्या सव्वा भाडे लावून संकट काळातही लुटालुटीची संधी शोधणारे आहेतच (अर्थात सर्वच संधीचा लाभ घेणारे नसतात, प्रामाणिक व्यवसाय करणारे ही आहेतही) रुग्णवाहिकेचे भाडे परवडत नसल्यामुळे अशावेळी टॅक्सीच्या टपावर मृतदेह ठेवून स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणावा लागतो यासारखी हृदय पिळवून टाकणारी घटना कोणती असू शकते. नव्हे हीच तर नोकरदार, मध्यमवर्गीय माणसाची शोकांतिका होय.

हे सार पाहताना विचार येतो समाजाची मानसिकता, समाज मन फक्त व्यवहाराच्या वाटेने जाणार का? बांधिलकी, परोपकार, नैतिक कर्तव्य हे शब्द फक्त मानवी जीवनात अर्थहीन शब्दच राहणार का की ही स्पंदने बधिर होत चाललीत? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात. कर्तव्य, परोपकार, दान यावर व्यवहाराने, स्वार्थाने मात केलीय हेच अंतिम सत्य होय असेच दुर्दैवाने म्हणावे लागतेय.

- विश्वनाथ पंडित, चिपळूण, रत्नागिरी
Powered By Sangraha 9.0