भारतात PUBG बॅन का नाही? जाणून घ्या याचे उत्तर...

30 Jun 2020 13:48:10
PUBG_1  H x W:


भारत सरकारने बंदी घातलेल्या ५९ अ‍ॅपच्या यादीत ‘पबजी’ नाही!


मुंबई : पबजी हा मोबाईल गेम भारतात तरुणाने मध्ये खूप प्रसिद्ध आहे. लहान मुलांपासून तर तरुणांपर्यंत या गेमचे एक व्यसन लागले आहे. एकदा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या गेम बद्दल उल्लेख त्यांच्या एका कार्यक्रमात केला होता, यावरून या गेमची प्रसिद्धी भारतात किती हे लक्षात येते.


सीमेवरील तणाव व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी चिनी अ‍ॅपविषयी दिल्यानंतर केंद्राने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचे हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९अ च्या अधिकाराचा वापर करत निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे केंद्र सरकारने जारी केले.


५९ चिनी अ‍ॅपवर बंदीच्या प्रश्नांवरून नेटकरांना एकाच प्रश्न पडला आहे की,”भारतात PUBG बॅन का बरे नाही ? ” तर याचे उत्तर असे आहे ही पबजी एक चिनी अँप नसून, ते दक्षिण कोरियाच्या एका कंपनीने बनवलेले अँप आहे. अद्यापही पबजीवर भारतात बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही. तर सध्या पबजी प्रेमी या गेमचा आनंद घेऊ शकणार आहेत.

 
Powered By Sangraha 9.0