भारत-चीन वाद : पुन्हा एकदा जपान भारताच्या पाठीशी!

    दिनांक  30-Jun-2020 09:31:01
|

Japan_1  H x W:


भारत आणि जपानच्या नौदलाच्या युद्धाभ्यास


नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये तणावाची परिस्थिती आहे. दरम्यान, भारत आणि जपान यांनी समुद्री युद्धाभ्यास केले आहेत. त्यात अनेक युद्धनौका सहभागी होत्या. दोन्ही देशांतील दोन लढाऊ जहाजांनी यात भाग घेतला. शनिवारी हा युद्धाभ्यास जाहीर करण्यात आला. तथापि, भारत आणि जपान यांच्यात हा नित्य नौकाचा अभ्यास होता. ही प्रथा परस्पर संबंधांना चालना देण्यासाठी केली गेली.


नॅशनल मेरीटाईम फाउंडेशनचे डायरेक्टर जनरल व्हाईस अडमिरल प्रदीप चौहान म्हणाले की आम्ही रणनीतिक संवादांसाठी सराव करीत आहोत. त्यांनी असेही सांगितले की, नौदलाने युद्धच्या दृष्टीने सराव नाही केला. पूर्व चीन समुद्रातील बेटांवर चीनचा जपानशीही वाद आहे. हिंद महासागरातील चीनच्या वाढत्या धोक्यांचा सामना करण्यासाठी भारतीय आणि जपानी नौदलाने संयुक्त युद्धाभ्यास केला.


यावर नवी दिल्लीतील जपानी दूतावासाने म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांत भारत आणि जपानचा हा १५ वे युद्धाभ्यास आहे. दूतावासाचे प्रवक्ते तोशिहाइड एंडो यांनी सांगितले की आयएनएस राणा आणि आयएनएस कुलुश हे भारताचे होते तर जपानी नौदलाचे जेएस करिश्मा आणि जेएस शिमायुकी या युद्धाभ्यासमध्ये सहभागी होते.


डोकलाम वादाच्या वेळी जपान हा भारताला जाहीरपणे पाठिंबा दर्शविलेल्या देशांपैकी एक होता. त्याचबरोबर जपानने गलवान व्हॅलीमध्ये भारतीय सैनिकांच्या शहादतबद्दल ही शोक व्यक्त केला आहे. त्यामुळे भविष्यात जपान पुन्हा एकदा भारताबरोबर सज्ज असल्याचे दिसत आहे. दरम्यान चीनच्या लढाऊ विमानाने जपानच्या हद्दीत प्रवेश केला होता, मात्र जपानी सैन्याने त्यांना पिटाळून लावले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.