कोरोनाने मृत पावणाऱ्या कोरोनायोद्ध्यांना शहिदांचा दर्जा द्या : आठवले

30 Jun 2020 17:34:22
Ramdas_athawale _1 &







मुंबई : कोरोनाच्या जीवघेण्या संकटकाळात समाज रक्षणासाठी कोरोना विरुद्ध लढणारे अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस अधिकारी; पोलीस शिपाई ; कर्मचारी; रुग्णालयातील डॉक्टर ; नर्स;वॉर्ड बॉय तसेच महापालिकेचे कर्मचारी हे सर्व कोरोनायोद्धे असून कोरोना विरुद्ध लढताना या योद्ध्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना शहिदांचा दर्जा द्यावा अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
कोरोनाविरुद्ध लढताना मृत पावणाऱ्या कोरोनायोद्ध्यांच्या कुटुंबियांपैकी एकाला अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. या मागणीचे पत्र आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.राज्यात कोरोनाशी लढताना आपल्या प्राणांची बाजी लावलेल्या अनेकांच्या कुटूंबियांना दिलासा देण्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात येत आहे.


Powered By Sangraha 9.0