‘टिक-टॉक’ बंदीनंतर आता स्वदेशी ‘चिंगारी’चा भडका !

30 Jun 2020 15:06:16


Chingari App_1  

 
 
 

नवी दिल्ली : कोरोनानंतर भारत आणि चीनमधील तणाव यामुळे भारतीयांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तब्बल ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी टाकली. यामध्ये टिक- टॉक या अ‍ॅपचादेखील समावेश आहे. हे अ‍ॅप बंद झाल्यानंतर आता स्वदेशी ‘चिंगारी’ अ‍ॅपकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा अ‍ॅप दर एका तासाला तब्बल लाखोच्या संख्येत डाऊनलोड होत असल्याची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ‘टिक-टॉक’ या चीनी अ‍ॅपला आता स्वदेशी पर्याय म्हणून ‘चिंगारी’ अ‍ॅप कडे पाहिले जात आहे. आत्तापर्यंत ३ दशलक्ष लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.

 
 
 
 

केंद्रीय मंत्रालयाने कलम ६९ अ अंतर्गत देशाच्या सुरक्षेकरिता आणि जनहित लक्षात घेता ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला. यानंतर टिक-टॉक या चीनी अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी मेड इन इंडियाचे चिंगारी अ‍ॅप लाखोच्या संख्येने डाऊनलोड केले जात आहे. चिंगारी अ‍ॅपचे सह संस्थापक सुमित घोष यांनी माहिती दिली की, “चिंगारी अ‍ॅप हा दर तासाला लोखोंनी डाऊनलोड होत आहे. अचानक डाऊनलोडिंगमध्ये वाढ झाल्याने अ‍ॅपचे सर्व्हर डाऊन झाले असून आम्ही त्यावर काम करत आहोत. लोकांनी त्यामुळे थोडा धीर धरावा.” असे आश्वासनदेखील त्यांनी केले आहे.

 
Powered By Sangraha 9.0