महाराष्ट्र : कोरोनाच्या विळख्याबरोबर राज्याचा मृत्यदरही वाढतोय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2020
Total Views |

Corona Maharashtra_1 


सोमवारी १८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू; तर नव्या ५२५७ नवे रुग्ण


मुंबई : कोरोनाचा विळखा घट्ट झालेला दिसत असतानाच महाराष्ट्रात सोमवारी १८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आता राज्याचा मृत्युदरही वाढतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी राज्यात ५२५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सोमवारी मृत्यू झालेल्या १८१ रुग्णांमध्ये ७८ मृत्यू हे गेल्या ४८ तासांमधील आहेत. तर १०३ मृत्यू हे मागील २४ तासांतील आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १६९८८३ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात ७३२९८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर ७४२९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.


राज्यात सोमवारी २३८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत देण्यात आलेल्या सवलती, नियमांमधील शिथीलता कायम राहणार आहेत.


मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत नवीन १७ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@