तुफान आलया.... !

    दिनांक  03-Jun-2020 15:39:34
|
cyclone_1  H x

 
मुंबईवर दुहेरी संकट , करोनाने मेटाकुटीस आलेल्या मुबईकरांची 'निसर्ग'ही वाताहात करणारे आहे. संकटे आली कि ती एकापाठोपाठ दत्त म्हणून उभी राहतात. परंतु वादळाच्या बाबतीत, मुंबईकरांना आत्तापर्यंत एक सुखावणारी आणि आनंदाची बाब म्हणजे, यापूर्वी अनेक वादळे आली आणि गेली, परंतु मुंबईकरांच्या वाटेला देखील ती फिरकली नाहीत. यावेळेस देखील तसेच व्हावे ही सदीच्छा.आधीच कोरोना नावाच्या विषाणूने आपल्या देशात कहर माजवला आहे. त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होऊ नये, म्हणून, गेल्या दोन अडीच महिन्यांपासून देशात टाळेबंदी जाहीर झाली आहे. पर्यायाने कारखाने, उद्योगधंदे बंद आहेत त्यामुळे देशाच्या अर्थचक्रावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यात भरीस भर म्हणून निसर्ग नावाच्या वादळाने प्रशासनाची झोप उडवली आहे. या चक्राकार वादळामुळे, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे मच्छीमार लोकांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. 


अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तरीही या धुवाधार पडणाऱ्या पावसाने कोणाचे कसे व किती नुकसान होईल याचा अंदाज देता येत नाही. या प्रसंगी नौदल, लष्कर यंत्रणा नेहमीच जीव धोक्यात घालून काम करत असतात, त्यांचे कौतुक वाटते. या ठिकाणी आनंदाची, समाधानाची बाब म्हणजे, चक्रीवादळाच्या कठीण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या आपत्तीच्या प्रसंगी केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले आहे. थोडक्यात उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोना नावाच्या विषाणूने रौद्र रूप धारण केले आहे. ते अजून संपत नाही तोच, निसर्ग नावाच्या वादळाने आव्हान दिले आहे. थोडक्यात या व इतर अनेक अनेक कठीण प्रसंगात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे.


- गुरुनाथ वसंत मराठे, मुंबई
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.