मातोश्रीवर पुन्हा एकदा कोरोनाबाधित ?

    दिनांक  03-Jun-2020 13:02:25
|
UT _1  H x W: 0मुंबई
: कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईसह महाराष्ट्रामध्ये वाढत असून शिरकाव आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्यातही झाला आहे. काही दिवसांपूर्वी बंगल्याजवळच्या चहा टपरीवाला कोरोनाबाधित आढळल्यानंतर पोलिसांनाही लागण झाली.  त्यानंतर आता तेथील कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचा अहवालही पॉझिटीव्ह आल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘मातोश्री’ची चिंता वाढली आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती आली नसली तरीही बंगल्याच्या खबर्दरिअर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 


 
संबधित वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मातोश्रीवर पाळीव कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण मातोश्री बंगला सॅनिटाईज करण्यात आला आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील अन्य सदस्य या कर्मचाऱ्याचा थेट संपर्कात आलेले नाही, असे सांगण्यात आले आहे. मात्र, ठाकरे कुटुंबीयांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे. यापूर्वी ‘मातोश्री’च्या गेट क्रमांक २ जवळ असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळ असणाऱ्या चहावाल्याला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर मातोश्रीबाहेर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या ३ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.