"कृतज्ञ मी! कृतार्थ मी!" स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर तयार होतेय एक नवी कलाकृती!

03 Jun 2020 17:02:39

Savarkar_1  H x


स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कौटुंबिक तसेच सामाजिक संबंधांवर भाष्य करणार हे नाटक!


मुंबई : सावरकरांच्या तेजस्वी जीवनावर लिहावे असे अनेक लेखकांना वाटते. आजपर्यंत या महानायकाच्या जीवनावर जवळजवळ आठ नाटके मराठी रंगभूमीवर आली, त्यातले एक नाटक म्हणजे 'होय! मी सावरकर बोलतोय! हे नाटक लिहिणारे सिद्धहस्त लेखक म्हणजे बदलापूरचे कादंबरीकार श्री. अनंत शंकर ओगले. यांनी सावरकरांच्या राजकीय व्यक्तीमत्वाच्या अराजकीय जीवन प्रवासावरील अथवा सावरकरांच्या कौटुंबिक तसेच सामाजिक संबंधांवर नवे नाटक लिहिले असून सौ. नेत्रा ठाकूर 'मधुबिंब' या संस्थे मार्फत "कृतज्ञ मी! कृतार्थ मी!" या नावाने रंगभूमीवर लवकरच सादर करणार आहेत.


या नाटकाचे दिग्दर्शन, नेपथ्य व भूमिका ठाण्याचे रंगकर्मी यतिन ठाकूर यांनी हे शिवधनुष्य उचलले असून या नाटकासाठी दृक-श्राव्य तंत्राचाही वापर करण्यात येणार आहे तसेच संगीताची जबाबदारी अनुराग गोडबोले या होतकरू संगीत दिग्दर्शकाने स्वीकारली आहे.
Powered By Sangraha 9.0