दुपारी १ ते ३ पर्यंत वादळ अलिबागला धडकण्याची शक्यता

    दिनांक  03-Jun-2020 10:18:56
|

nisarg_1  H x W
 
 
मुंबई : कोरोनाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट ओढावले आहे. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रावर निसर्ग नावाचे चक्रीवादळ धडकणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, प्रचंड वेगाने समुद्रातून पुढे सरकणारे हे वादळ बुधवारी दुपारी १ ते ३ वाजण्याच्या सुमारास अलिबाग आणि मुंबईत धडकणार आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीला बसणार आहे. हे चक्रीवादळ धडकण्यापूर्वी राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणात रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी वाऱ्याचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे.
 
वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हजारो नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये ११ हजारांहून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम एनडीआरएफच्या टीमने केले.
 
कुठून किती जणांचे स्थलांतर?
 
>अलिबाग- ४,४०७
>पेण- ८७
>मुरुड- २,४०७
>उरण- १,५१२
>पनवेल- ५५
>श्रीवर्धन- २,५५३
>म्हसळा- २३९
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.