कोरोना रुग्णांवर योगसाधनेद्वारे उपचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2020
Total Views |
Yog Class in Terna Hospit







नवी मुंबई : महाराष्ट्रात मुंबई व लगतच्या ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, पनवेल शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे परंतु रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुळे होणार मृत्युदर कमी आला आहे शहरातील महानगरपालिका, राज्याची आरोग्य यंत्रणा सरकारी व खासगी रुग्णालये पॉजिटीव्ह रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहेत. ज्या रुग्णांना कोणताही दीर्घकालीन आजार नसतो व टेस्ट पॉजिटीव्ह असूनही ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे नसतात अथवा सौम्य लक्षणे आढळतात, असे रुग्ण जलद गतीने बरे होतात.


याच पार्श्वभूमीवर नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी व रिसर्च सेन्टरतर्फे जून महिन्यात साजरा होणाऱ्या जागतिक योग सप्ताहच्या निमित्ताने तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्त नागरिकांना २१ जून ते ३० जून या काळामध्ये योगसाधनेचे धडे देण्यात येत आहे. कोरोनाला दूर सारण्यासाठी रोग प्रतिकारक क्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे हेच ओळखून डॉ. स्वामी योगप्रताप व डॉ. दीपा काला यांनी कोरोना झालेल्या रुग्णांना बेडवर बसवून योग प्रशिक्षण देत आहेत. 


कोरोना झाल्यामुळे मनावर आलेला ताणतणाव यामुळे कमी होण्यास मदत होत आहे तसेच श्वसनसंस्था अधिक बळकट करण्यासाठी त्यांना फुग्यामध्ये हवा भरणे, बसल्या जागेवरून प्राणायाम व सोपी योगासने त्यांना शिकविण्यात येत आहेत. ओंकार, दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम, भ्रमर, कपालभाती, भसरीका या योगप्रकारांची त्याना योग्य माहिती देण्यात येत असून जेव्हा हे रुग्ण घरी जातील तेंव्हा त्यांना या योग प्रशिक्षणाचा नक्कीच उपयोग होईल कारण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक योग साधना केंद्रे तसेच जिम बंद राहणार आहेत.




कोरोना लगेच संपणार नाही. काही वर्ष तो आपल्याबरोबर राहणार आहे. परंतु नक्कीच तो सौम्य होत जाणार आहे. त्याच्याशी सतत लढण्यासाठी आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी लागणार आहे व त्यासाठी योगसाधना आत्मसात करणे गरजेचे आहे, असे मत तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. दीपा काला यांनी व्यक्त केले. सौम्य लक्षणे असणाऱ्या पॉजिटीव्ह रुग्णांना योगाचे महत्त्व पटवून देत घरी गेल्यावर दररोज योगा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. योगा शिकवताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पीपीई कीट परिधान केले होते व फिजिकल डिस्टंन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्यात आले होते.










@@AUTHORINFO_V1@@