मराठीत 'काँग्रेस' शब्द नीट लिहा ! पुणेकरांचा टोमणा !

    दिनांक  29-Jun-2020 14:29:00
|
Congress_1  H x
पुणे : इंधनदरवाढीविरोधात राज्य सरकारचे मंत्रीच रस्त्यावर उतरल्याने आता हे नाटक काँग्रेसने बंद करावे, असा टोला लगावण्यात येत आहे. राज्यातील सत्तेत असतानाही अधिभार रद्द करण्याचा निर्णय का घेत नाहीत, असा प्रश्नही महाविकास आघाडीला विचारण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनात पुणेकरांनी मात्र, काँग्रेसची एक चूक शोधून काढत टोला लगावला आहे. 

आधी मराठीत काँग्रेस हा शब्द नीट लिहा, मग आंदोलन करा, असा टोला काँग्रेसला लगावण्यात आला आहे. विशेष म्हणजे व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरातही दिसत आहेत. इंधनदरवाढ विरोधात सुरू असलेल्या या आंदोलनात उतरण्याची गरज मंत्र्यांना का पडली, असाही प्रश्न विचारण्यात येत आहेत. राज्यातील सरकारने पेट्रोलवर वाढवलेला तीन रुपयांचा अधिभार रद्द करावा, अशी मागणीही करण्यात येत आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.