पेट्रोलवर कर वाढवणारेच मंत्री आंदोलन करतात तेव्हा !

    दिनांक  29-Jun-2020 13:45:00
|
balasaheb thorat_1 &मुंबई : काँग्रेसतर्फे इंधनदरवाढ विरोधात देशभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन केले जात आहे. पेट्रोल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार, असो अशा घोषणा यावेळी देण्यात येत आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारनेच पेट्रोलच्या किमतीवर एप्रिल महिन्यात अधिभाराची रक्कम वाढवली होती याचा काँग्रेस नेत्यांना विसर पडला कि काय, अशी सध्याची अवस्था आहे. राज्य सरकारतर्फे पेट्रोलवर एप्रिलपूर्वी सहा रुपये अधिभार लावण्यात येत होता. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात हा अधिभार रद्द करण्यात आला होता. या सहा रुपयांवर २३ एप्रिल रोजी आणखी तीन रुपये वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात पेट्रोलवर यापूर्वी २६ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि सहा रुपये अधिभार लावला जात होता. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या निवारणासाठी हा अधिभार लावण्यात येत होता. या अधिभाराची मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपुष्टात आली. तरीही तो वसूल केला जात होता. आता त्यात आणखी तीन रुपयांची भर पडल्याने राज्यात इंधन दरवाढ झाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुरू असलेल्या दरवाढीचा फटका राज्यातील नागरीकांना बसला. दारूबंदीमुळे घट झालेल्या महसुलात वाढ करण्यासाठी शुल्क वाढ करण्यात आली आहे. यामुळे राज्याला तीन हजार कोटींचा महसुल मिळणार होता. कोरोनाच्या काळात तिजोरीत झालेला खडखडाट पाहता ही शुल्कवाढ करण्यात आली आहे. मात्र, ही परिस्थिती बाजूला सारून राज्य सरकारमधील नेतेच इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना दिसत आहेत. आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.