पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला

    दिनांक  29-Jun-2020 11:45:45
|
PSE_1  H x W: 0इस्लामाबाद : कराची स्थित पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला झाला आहे. सोमवार सकाळी पाकिस्तानच्या शेअर बाजार इमारतीत चार दहशतवादी घुसले आणि बेछुट गोळीबार सुरू केला. आत्तापर्यंत तीन दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांच्या गोळीबारात दोन जणांनी आपला जीव गमावला आहे.


पाकिस्तान मीडिया जियो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवादी मारले गेले आहेत. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत एक जण इमारतीत घुसून बसल्याची माहिती घटनास्थळाहून मिळाली. दहशदवाद्यांनी मुख्य प्रवेशद्वारावर ग्रेनेड हल्ला केला आणि अंधाधूंद गोळीबार सुरू केला. यात एक पोलीस ऑफिसर आणि गार्ड जखमी झाले आहेत.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.