राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ !

    दिनांक  29-Jun-2020 16:55:30
|

mumbai_1  H x W
मुंबई : महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला आहे. राज्याम्ह्द्ये सध्या जे नियम लागू आहेत तेच राहणार असल्याचे राज्य सरकारने लागू केलेल्या परिपत्रकामध्ये म्हंटले आहे. मुंबईसह महाराष्ट्रमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भावाने ग्रासले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. अशामध्ये राज्य सरकारने लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
 
 
 
 
 
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज ५ हजार रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे सरकारसाठी हा पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला होता. फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच लांबचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येणार आहे. मात्र मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं सक्तिचं असणार आहे. दुसरीकडे २ जुलैपासून पुढील १० दिवस ठाणे शहरात संपूर्ण लोकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे. अशी माहिती ठाणे शहर पोलिसांनी ट्विट करुन दिली आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.