कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2020
Total Views |

plasma therapy_1 &nb


५०० लोकांवर प्लाझ्माचा थेरपीचा उपचार सुरू


मुंबई : दीड लाखांहून अधिक संक्रमित रूग्ण असलेल्या महाराष्ट्रात आज जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी चाचणी सुरू झाली. राज्य सरकारने याला 'प्रोजेक्ट प्लेटिना'चे नाव दिले आहे. आज एकाचवेळी ५०० रुग्णांना प्लाझ्मा थेरेपीचे दोन डोस देण्यात आले. या रुग्णांवर आढळून आलेल्या परिणामानंतर संपूर्ण राज्यात गंभीर रुग्णांवर ही थेरपी केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने ७५ कोटींचे अतिरिक्त बजेट निश्चित केले आहे. या थेरपीचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.


कोरोनामुळे होणारा मृत्यू दर कमी करणे हा याचा उद्देश आहे. चाचणी आधारावर सरकारने दावा केला आहे की दहा पैकी नऊ रुग्ण प्लाझ्मा थेरपीमधून बरे होत आहेत. सरकारचा असा दावा आहे की मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील पहिले प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली. त्यानंतर मुंबईतच बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये दुसर्‍या रूग्णवर आणखी एक प्रयोग करण्यात आला.


महाराष्ट्र हे प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे देशातील पहिले राज्य आहे. आजपासून सोलापूर आणि लातूरमध्ये प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलला सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी साडेबारा वाजता या ट्रायलचे उद्घाटन केले. सिव्हिल रुग्णालयाच्या रक्तपेढीत दोन दात्यांना बोलावून त्यांचा प्लाझ्मा काढून घेण्यात आला. यासाठी गेल्या आठवड्यातच मशीन कार्यान्वित झाल्या आहेत.




@@AUTHORINFO_V1@@