टिकटॉक, हेलोसह ५९ चीनी अ‍ॅप्सना केंद्राचा दणका !

29 Jun 2020 21:16:24
Banned_1  H x W

देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या या अ‍ॅप्सवर सरकारने घातली बंदी!

नवी दिल्ली : भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका पोहोचवू शकतील किंवा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता असलेली ५९ चायनीज मोबाईल अॅपवर बंदी घालायचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. टिकटॉक, हेलो सारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा यांत समावेश आहे.

देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम ६९ अ च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




Banned_1  H x W


देशवासीयांची सायबर स्पेस सुरक्षित राहावी, यासाठी हा निर्णय घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. या ५९ अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर मोबाईल अॅप्स आणि इंटरनेट वापरताना कोणती काळजी घ्यावी, डाऊनलोड करताना कुठली माहिती द्यावी याबाबत भारत सरकारने निवेदन जारी केले आहे.


Powered By Sangraha 9.0