सडक २, लक्ष्मी बॉम्ब आणि भूजसह ९ चित्रपट ओटीटीवर होणार प्रदर्शित!

    दिनांक  29-Jun-2020 19:35:31
|

Films_1  H x W:कोरोनामुळे चित्रपटगृह बंद असल्याने चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय!


मुंबई : आलिया भट्टचा सडक २, अभिषेक बच्चनचा ‘द बिग बूल’, अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ आणि अजय देवगणच्या भूज’अस आणखी काही चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करण्यात येणार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या कलाकारांचे एवढे चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शितहोत आहेत. या यादीत आतापर्यंत ८ ते ९ चित्रपट यात सामील करण्यात आले आहेत.


कोरोना व्हायरसचा परिणाम चित्रपटसृष्टीवरदेखील झालेला पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन थांबले आहे. त्यामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन ओटीटी प्लॅटफॉर्मवर करण्याचा निर्णय घेतला आहे. दिग्दर्शक मुकेश भट्ट यांनी दिलेल्या मुलाखतीत ‘सडक २’ चित्रपट ओटीटीप्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.