शुअरक्लिन... आता हात होतील निर्जंतुक क्षणात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2020
Total Views |
Pitambari_1  H




इथिल अल्कोहोलयुक्त ‘पितांबरी शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटायझर’ केवळ कोरोना विषाणूसाठीच नव्हे, तर आपल्या हातांवरील सर्वच घातक, तसेच साथीचे आजार पसरवणार्‍या विषाणू, जिवाणूंना निर्बंध करण्यासाठी उपयुक्त ठरते. आपल्या हातांवर असलेल्या कुठल्याही घातक विषाणूला एक मेद आवरण असते. ज्यामुळे तो विषाणू संसर्ग करु शकतो. पण, ‘पितांबरी शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यावर यामधील इथिल अल्कोहोलमुळे विषाणूवरील हे मेद आवरण विरघळण्यास मदत होते, ज्यामुळे तो विषाणू संपूर्णपणे नष्ट होतो आणि आपल्याला कुठलाही रोगसंसर्गाची बाधा होत नाही. तेव्हा आपले हात निर्जंतुक करण्यासाठी इथिल अल्कोहोलयुक्त ‘पितांबरी शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करणे प्रौढांसोबतच लहान मुलांसाठीही हितकारक ठरणार आहे.

जगभरात पसरलेल्या घातक कोरोना विषाणूचा संसर्ग महाराष्ट्रातही दिवसागणिक वेगानं वाढताना दिसत आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या आता ६५,८४४ झाली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांमध्येच चिंता, भीती, अस्वस्थता वाढली आहे. कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी सध्यातरी विलगीकरण, मास्क, ग्लोव्हज आणि हातांच्या स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा वापर हे उपाय प्रामुख्याने राबविले जात आहेत. यातील हातांच्या स्वच्छतेचा उपाय हा थेट आपल्या आरोग्याशी निगडित आहे. कोरोना हा साथीचा आजार असल्याने हाताद्वारे लगेच संसर्ग होण्याची शक्यता असते. हात स्वच्छ धुतल्याने जंतूंचा नायनाट होऊन कोरोना विषाणूबरोबरच अनेक साथीच्या रोगांपासून दूर राहण्यास मदत होते व आपले शरीर निरोगी राहते. त्यामुळे ‘कोविड-१९’ रोगसंसर्गाच्या काळात हातांची ‘सुरक्षा’ आणि ‘स्वच्छता’ राखणे अतिशय महत्त्वाचे ठरते.


खरंतर सध्याच्या व्यग्र जीवनशैलीत आपण आपल्या हातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. सतत हात धुण्याचा त्रास नको म्हणून ‘गेले चार जीवाणू पोटात तर बिघडलं कुठे?’ असाच विचार आपण करत होतो. पण, आता हातांच्या स्वच्छतेचं गांभीर्य आपल्या सर्वांच्याच लक्षात आल्यामुळे एरवी सतत हात धुण्याचा कंटाळा करणारे आपण आता कोरोना व्हायरसपासून संरक्षण व्हावं, यासाठी थोड्या-थोड्या अंतराने हॅण्ड सॅनिटायझरचा उपयोग करुन हात स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. खरंच हॅण्ड सॅनिटायझरमुळे हातांची स्वच्छता ठेवणं किती सोपं झालं आहे! बाजारात अनेक कंपन्यांचे हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध आहेत. पण, यापैकी चांगला हॅण्ड सॅनिटायझर कुठला, हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. ‘इथिल-अल्कोहोल’ हा हॅण्ड सॅनिटायझरचा मुख्य घटक असतो. जोे हातांवरील जीवाणू, विषाणूला निर्बंध करण्यासाठी उपयुक्त ठरतो. पण, अलीकडे बनावटी हॅण्ड सॅनिटायझरचे प्रमाण वाढल्यामुळे असे हॅण्ड सॅनिटायझर अल्कोहोलयुक्त आहेत की नाही किंवा हे हॅण्ड सॅनिटायझर विषाणू, जिवाणू नष्ट करतील, हे खात्रीशीररित्या सांगता येणार नाही. तसेच ‘इथिल अल्कोहोल’च्या नावाखाली हॅण्ड सॅनिटायझरमध्ये निकृष्ट दर्जाची अल्कोहोलसुद्धा वापरली जातात. ज्याचा आपल्या त्वचेला त्रास होऊ शकतो किंवा काही रिअ‍ॅक्शन्स होऊ शकतात. अनेकदा अशा बनावटी हॅण्ड सॅनिटायझरमध्ये निकृष्ट दर्जाच्या कच्च्या मालाचा वापर केल्यामुळे व यात मिसळलेल्या घातक रासायनिक घटकांमुळे हॅण्ड सॅनिटायझर लावल्यानंतर ते त्वचेच्या खोलवर पोहोचू शकत नाही व वरच्या भागावरच थर करुन राहतो. अशा बनावटी हॅण्ड सॅनिटायझरमुळे हातांची त्वचा कोरडी-रुक्ष पडणे, त्वचेला खाज येणे, त्वचेवर सालं येणे, त्वचेवर भेगा पडणे अशा गंभीर समस्या उद्भवू लागतात. परिणामी, त्वचेचे विकार होऊ शकतात.


या सर्व समस्या लक्षात घेऊन अभिनव उत्पादनांची निर्मिती करणार्‍या ‘पितांबरी’ कंपनीने ‘इथिल अल्कोहोल’युक्त ‘शुअर क्लिन’ हॅण्ड सॅनिटायझर हे अत्यंत प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन बाजारात उपलब्ध केलं आहे. नेहमीच ‘पितांबरी’ने आपल्या सगळ्याच उत्पादनातील घटक पदार्थांना महत्त्व दिले आहे. त्याचप्रमाणे यावेळेसही ‘पितांबरी’ने घटक पदार्थांची परिणामकारकता आणि उपयुक्तता सिद्ध करुनच उच्च दर्जाचे आणि शुद्ध ‘कॉस्मेटिक रॉ मटेरिअल’ वापरुन ‘फार्मा ग्रेड’चे ‘शुअर क्लिन’ हॅण्ड सॅनिटायझर तयार केले आहे. यामध्ये हातांवरील घातक जंतू-विषाणूंचा नाश करण्यासाठी ‘इथिल अल्कोहोल’, हातांच्या सुरक्षिततेसाठी ‘अ‍ॅलोव्हेरा’ आणि सुगंधासाठी ‘लेमनग्रास’ असे तिहेरी फायदे देणार्‍या दर्जेदार घटक पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. जेणेकरुन वापरकर्त्याला त्याचा काही अपाय होणार नाही. असे हे ‘इथिल अल्कोहोल’युक्त ‘पितांबरी शुअरक्लिन हॅण्ड सॅनिटायझर’ तुमच्या हातांवरील आजार पसरवणार्‍या ९९.९ टक्के घातक जंतूंचा (बॅक्टेरिया), विषाणूंचा (व्हायरस) तत्काळ नाश करते. ज्यामुळे तुमच्या हातांची निर्जंतुक स्वच्छता होते.


हवेतल्या धुळीमुळे आपल्या हातांवर असंख्य, अदृश्य रोगजंतू बसत असतात. आपल्या डोळ्यांनाही न दिसणारे हे सूक्ष्म जंतू अन्नपदार्थांबरोबर आपल्या पोटात जातात. त्यातून आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. एकमेकांना केलेल्या हस्तांदोलनातूनही जंतूंचा संसर्ग होण्याचा धोका असतो. कोरोना व्हायरसबाबत सांगायचं झालं तर, एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या थुंकीचे कण एखाद्या पृष्ठभागावर (जसे खुर्ची, टेबल, दरवाजा इ.) पडले असता, यांसारख्या पृष्ठभागावर विषाणू बराच काळ जीवंत राहतात. जर एखाद्या व्यक्तीने त्या पृष्ठभागास स्पर्श केला आणि त्याच हाताने त्याने स्वत:च्या डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श केला तर हा विषाणू त्याच्या हातांच्या संसर्गामुळे शरीरात जातो. त्यामुळे हे धोके टाळण्यासाठी सतत हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले हात बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुक्त करण्यासाठी ‘पितांबरी शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटायझरमधील ‘इथिल अल्कोहोल’चा वापर परिणामकारक ठरणार आहे. ‘इथिल अल्कोहोल’ हे उत्तम जंतुनाशक असल्यामुळे, हातांवरील घातक विषाणूंचा समूळ नाश करण्यासाठी ते दर्जेदार मानले जाते. म्हणूनच ‘पितांबरी’ने पूर्ण संशोधन करुन हॅण्ड सॅनिटायझरसाठी प्रमाणित ‘इथिल अल्कोहोल’चाच ‘शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटायझरमध्ये वापर केला आहे.


‘इथिल अल्कोहोल’युक्त ‘पितांबरी शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटायझर केवळ कोरोना विषाणूसाठीच नव्हे, तर इतर सर्व घातक तसेच साथीचे आजार पसरवणार्‍या विषाणू, जीवाणूंना निर्बंध करण्यासाठी उपयुक्त ठरते. आपल्या हातांवर असलेल्या कुठल्याही घातक विषाणूंना एक मेद आवरण असते. ज्यामुळे तो विषाणू संसर्ग करु शकतो. पण, ‘पितांबरी शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटारझरने हात स्वच्छ केल्यावर यामधील ‘इथिल अल्कोहोल’मुळे विषाणूवरील हे मेद आवरण विरघळण्यास मदत होते, ज्यामुळे तो विषाणू संपूर्णपणे नष्ट होतो आणि आपल्याला कुठलाही रोगसंसर्ग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा ‘इथिल अल्कोहोल’युक्त ‘पितांबरी शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटायझरचा वापर आपल्यासाठी हितकारक ठरणार आहे. त्यामुळे प्रौढांसोबतच हे हॅण्ड सॅनिटायझर लहान मुलांनाही वापरायला हरकत नाही.


नुकताच काही प्रमाणात ‘लॉकडाऊन’उठवल्यामुळे नोकरी-धंद्यासाठी लोक बाहेर पडू लागली आहेत. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून हॅण्ड सॅनिटायझरच्या वापराचे प्रमाण वाढत चालले आहे. वारंवार बाहेर असल्याने किंवा संक्रमित भागात असल्याने साबण-पाण्याने हात धुणे शक्य नाही. अशा वेळी प्रत्येकालाच हॅण्ड सॅनिटायझर वापरणे गरजेचे होते. सध्या दिवसातून सात ते आठ वेळातरी प्रत्येकजण सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ ठेवत आहे. पण, सॅनिटायझरचा सतत वापर केल्यास यातील अल्कोहोलमुळे त्वचा कोरडी पडते. त्वचेवरील नैसर्गिक संरक्षण निघून जाते. कालांतराने आपले शरीर बाहेरच्या जीवाणूंच्या हल्ल्यासाठी अधिक प्रवण बनते. ज्यामुळे आपण सतत आजारी पडू शकतो. त्यामुळे हातांची त्वचा कोरडी राहणं हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. म्हणूनच ‘पितांबरी’ने ‘शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटायजरमध्ये ‘अ‍ॅलोव्हेरा’ म्हणजेच कोरफडीच्या गराचा समावेश केला आहे. अ‍ॅलोव्हेरा (कोरफड) हे एक नैसर्गिक मॉईश्चरायजर आहे, जे त्वचेतील आर्द्रता कायम ठेवून त्वचा मुलायम बनविण्यात साहाय्यक ठरतं. अ‍ॅलोव्हेरामधील अ‍ॅण्टिऑक्सिडंट गुण त्वचेला कोरडं होण्यापासून वाचवतात. ज्यामुळे तुमचे हात मऊ व मुलायम राहण्यास मदत होते आणि त्वचेची नैसर्गिक चमकही कायम राहते. त्यामुळे ‘पितांबरी शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ केल्यानंतरही त्वचेतला मॉश्चर कायम ठेवण्याची काळजी यामार्फत घेतली जाणार आहे. त्यामुळे तुमच्या कोरड्या पडणार्‍या हातांची चिंताही निश्चितपणे दूर होणार आहे.


असं म्हणतात, आरोग्य देण्याची ताकदही सुगंधात दडली आहे. म्हणूनच ‘पितांबरी’ने आपल्या ‘इथिल अल्कोहोल’युक्त ‘शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटायजरमध्ये सुगंधी ‘लेमनग्रास’ (गवती चहा) ऑईलचाही समावेश केला आहे. हॅण्ड सॅनिटायझरला ‘इथिल अल्कोहोल’चा विशिष्ट उग्र वास असतो. तो वास घालवण्यासाठी ‘पितांबरी शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटायजरमध्ये ‘लेमनग्रास ऑईल’ वापरले आहे. जे नैसर्गिक सुगंधाने युक्त असल्यामुळे ‘इथिल अल्कोहोल’चा उग्र वास तुम्हाला जाणवणार नाही. सॅनिटायझर वारंवार लावावे लागत असल्याकारणाने त्यातून लेमनग्रासचा ताजा-मंद सुगंध तुम्हाला मिळतो. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहून, तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी ते लाभदायक ठरते.



‘पितांबरी शुअरक्लिन’ वापरण्याची पद्धत

‘इथिल अल्कोहोल’युक्त ‘पितांबरी’चे ‘शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटायझर १००/२०० मिलीच्या बॉटलमध्ये आणि पाच लीटरच्या कॅनमध्येही उपलब्ध आहे. १०० तसेच २०० मिलीची बॉटल प्रवासात कुठेही नेण्यासाठी उपयुक्त ठरेल, तर पाच लीटरचा कॅन घेतल्यास सोसायटी, दुकाने, इंडस्ट्रियल-कमर्शियल डिपार्टमेंट आदी ठिकाणी वापरता येईल. ‘पितांबरी’ इथिल अल्कोहोलयुक्त ‘शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यासाठी १ मोठा ड्रॉप हातांवर घ्या आणि किमान २० सेकंद सॅनिटायझर हातांना दोन्ही बाजूंनी, बोटांमधून चांगले चोळा. थोड्या वेळाने सॅनिटायझरचे बाष्पीभवन होऊन ते हातांवरुन जंतू नष्ट करुन निघून जाईल.


सध्याच्या कोरोना व्हायरसच्या साथीमध्ये आरोग्याची ’सुरक्षा’ आणि वैयक्तिक ’स्वच्छता’ राखणे अनिवार्य झाले आहे. त्यातच हातांची स्वच्छता ही आपल्या शारीरिक स्वच्छतेची पहिली पायरी असल्यामुळे हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. तेव्हा घातक रोगजंतूंचा संसर्ग टाळून, आपले आरोग्य आपल्याच हातात राहावे म्हणून ’पितांबरी शुअरक्लिन हॅण्ड सॅनिटायझर वापरुया आणि सुरक्षित राहूया’!


‘इथिल अल्कोहोल’युक्त ‘पितांबरी शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटायझरच्या अधिक माहितीकरिता आणि ऑर्डरसाठी ९००४०३२९१४ या मोबाईल क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. तसेच ऑनलाईन मागणीसाठी www.pitambari.com/shop या वेबसाईटवर तसेच घरपोच ‘पितांबरी शुअरक्लिन’ हॅण्ड सॅनिटायझर हवे असल्यास १८०० १०३ १२९९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता येईल.




@@AUTHORINFO_V1@@