'महाविकास आघाडी'ने दाखवला फडणवीसांचा खोटा व्हीडिओ

    दिनांक  29-Jun-2020 15:05:02
|
DF_1  H x W: 0
सोलापूर : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल दरवाढीबद्दल बोलणे टाळले आणि ते निघून गेले, असा एक व्हीडिओ 'महाविकास आघाडी' नामक एका फेसबूक पेजवर प्रसारित करण्यात आला होता. बघा कसे भाजप नेते पत्रकारांना उत्तर न देताच पसार झाले, अशी आरोळी त्यानंतर उठली. मात्र, 'सोलापूर न्यूज नेटवर्क' या स्थानिक वेब पोर्टलने याबद्दलचा खुलासा करत फडणवीसांना क्लिन चीट दिली आहे. हा व्हीडिओ अर्धवट असून पूर्ण व्हीडिओत फडणवीसांनी या प्रश्नाला उत्तर देऊन मगच ते निघाले, असा घटनाक्रम आहे.

देवेंद्र फडणवीस या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात, "आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलच्या किमती ठरत असतात, सरकार कर कमी करण्यापलिकडे त्यावर दुसरा कुठलाही पर्याय निवडू शकत नाही. पेट्रोल कंपन्यांकडे इंधन दर कमी करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे थेट सरकार यात काहीही करू शकत नाहीत." मात्र, याबद्दलचा व्हीडिओ हवा तसा बदलून तो व्हायरल करण्यात आला. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.