नाना पाटेकरांनी घेतली सुशांतसिंगच्या कुटुंबियांची भेट

    दिनांक  28-Jun-2020 19:42:03
|

nana patekar_1  पटना :
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाने संपूर्ण बॉलीवूड आणि त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रत्येकजण त्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अभिनेता नाना पाटेकर यांनी रविवारी पाटणा येथील दिवंगत सुशांतसिंग राजपूत यांच्या निवासस्थानी भेट दिली. नाना पाटेकर यांनी सुशांतचे वडील के के सिंह यांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यापूर्वीही अनेक नेते आणि कलाकारांनी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.वास्तविक नाना पाटेकर हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर बिहारला गेले आहेत. तेथे त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमात भाग घेतला. शेतातही फेरफटका मारला. याशिवाय पावसाळी वातावरणात नाना पाटेकर यांनी शेतात नांगरणी देखील केली. त्यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. रविवारी त्यांनी सैन्य दलाच्या जवानांचीही भेट घेतली. लष्कराच्या जवानांनी नाना पाटेकर यांच्यासमवेत सेल्फीही घेतले.

यानंतर नाना पाटेकर पाटणातील राजीव नगर येथील सुशांतसिंग राजपूत यांच्या घरी गेले. त्यांनी सुशांतचे वडील के के सिंह यांची भेट घेतली. यावेळी नानांनी सुशांतच्या वडिलांना संयमपूर्वक काम करण्यासाठी धीर दिला. ते म्हणाले सुशांत एक प्रामाणिक अभिनेता होता. त्याला नक्कीच न्याय मिळेल. सुशांतच्या मृत्यूने संपूर्ण देश दु: खी आहे. यापूर्वी भोजपुरी अभिनेता आणि भाजप खासदार मनोज तिवारी त्यांच्या घरी गेले होते. नंतर भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव, राकेश मिश्रा आदींनी भेट घेतली. अनेक कलाकारांनी सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे . गेल्या आठवड्यात भोजपुरी अभिनेता आणि गायिका अक्षरा सिंगही सुशांतच्या घरी जाऊन भेट घेतली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.