मैत्री जपणे आणि शत्रूला उत्तर देणे भारताला माहित आहे : पंतप्रधान मोदी

28 Jun 2020 13:28:01

Mann ki baat_1  


‘मन की बात’द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साधला जनतेशी संवाद!

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. ते म्हणाले की २०२०मध्ये आपण अर्धा प्रवास पूर्ण केला आहे. सर्वत्र जागतिक महामारीची चर्चा आहे. प्रत्येकजण एकाच विषयावर चर्चा करीत आहे की हे वर्ष लवकर का जात नाही, हा रोग कधी संपेल. २०२० शुभ नाही असे ही लोक म्हणत असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.


यावेळी त्यांनी लडाखमधील भारत-चीन तणावापासून इतर अनेक विषयांवर भाष्य केले. भारताला जशी मैत्री निभावता येते, तशीच कुणी वाकडी नजर करुन पाहिल्यास जशास तसे उत्तरही देता येते. भारताने लडाखमध्ये देशाच्या सीमेचे चोख रक्षण केले आणि चीनला सडेतोड उत्तर दिले, असे मत यावेळी मोदींनी व्यक्त केले.


“देश आत्मनिर्भर होणे हीच शहीद जवानांना खरी श्रद्धांजली आहे. भारतीय जवान शहीद झाल्यावर देशातील अनेक लोकांनी लोकल गोष्टीच खरेदी करण्याचा निश्चय केला आहे. स्वातंत्र्यापूर्वी भारत इतर अनेक देशांच्या तुलनेत पुढे होता. त्यावेळी अनेक देश जे त्यावेळी आपल्या मागे होते ते खूप पुढे गेले. मात्र,स्वातंत्र्यानंतर आपल्याला पुढे जाता आले नाही. मात्र, आता भारत आत्मनिर्भरतेसह पुढे जात आहे. यात आपल्या सर्वांचा सहभाग अत्यावश्यक आहे. तुम्ही स्थानिक वस्तू खरेदी कराल आणि त्यासाठी बोलाल तर ती देशाला मजबूत करण्याची भूमिका आहे. ही एकप्रकारे देशसेवाच आहे. प्रत्येक क्षेत्रात देशसेवा करण्यास संधी असते,” असे मोदींनी सांगितले.


संकट येतच राहिले, आपण प्रत्येक संकट पार केले, परंतु सर्व अडथळे दूर करून नवीन निर्मिती केली गेली. नवीन साहित्य संशोधन केले गेले आणि तयार केले गेले. आपला देश पुढे जात राहिला. भारताने संकटाचे यशाच्या शिडीमध्ये रुपांतर केले आहे. तुम्हीही याच विचाराने पुढे जात राहा. आपण या संकल्पनेसह पुढे गेल्यास, हे वर्ष विक्रम स्थापित करेल. मला देशाच्या १३० कोटी जनतेवर विश्वास असल्याचे मोदिजी यावेळी म्हणाले.




Powered By Sangraha 9.0