पाक व चीनला खूश करणारी विधाने राहुल गांधी का करतात ?

28 Jun 2020 13:38:35
Amit Shah_1  H




गृहमंत्री अमित शाह यांचा काँग्रेसला प्रश्न

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शाह यांनी भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसी नेत्यांक़डून होणाऱ्या विधानांचा समाचार घेतला. या मुद्द्यावर आम्ही संसदेत चर्चा करण्यासाठी तयार आहोत, तिथे प्रश्न विचारा आम्ही उत्तर देऊ, १९६२ ते आत्तापर्यंत झालेल्या घटनाक्रमांवर दोन हात करू, असे आवाहन त्यांनी काँग्रेसला केले आहे. ज्यावेळी देश एक कठोर आणि मजबूत भूमिका घेऊ इच्छीत आहे, त्यावेळी सोबत उभे राहण्याची गोष्ट सोडून पाकिस्तान आणि चीनला खूश करणारी विधाने करायला नको होती, असा टोला त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना लगावला.
काँग्रेस पक्ष भाजपवर लोकशाही संपवण्याचा आरोप करत आहे, त्यावरही अमित शाह यांनी चोख प्रत्युत्तर दिले. लोकशाहीचे विविध पैलू आहेत. अनुशासन आणि स्वतंत्रता ही त्याची मुल्या आहेत. भाजपमध्ये लालकृष्ण आडवाणी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी पुन्हा राजनाथ सिंह आणि माझ्यानंतर पुन्हा जे.पी.नड्डा पक्षाध्यक्ष बनले. हे सर्व एका परिवारातील आहेत का ? इंदिरा गांधींनंतर काँग्रेसने सांगावे की, एकजण असा जो गांधी परीवाराबाहेरचा पक्षाध्यक्ष बनू शकला का ? आणि हे लोक लोकशाहीची चर्चा करतात, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.





Powered By Sangraha 9.0