कुटूंबाबाहेर पक्षाध्यक्ष निवड नाही, हे लोकशाहीच्या गप्पा मारतात!

    28-Jun-2020
Total Views | 289
Amit_Shah_1  H



नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष भाजपवर लोकशाही संपवण्याचा आरोप करत आहे, त्यावरही अमित शाह यांनी चोख प्रत्युत्तर दिले. लोकशाहीचे विविध पैलू आहेत. अनुशासन आणि स्वतंत्रता ही त्याची मुल्ये आहेत. भाजपमध्ये लालकृष्ण आडवाणी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी पुन्हा राजनाथ सिंह आणि माझ्यानंतर पुन्हा जे.पी.नड्डा पक्षाध्यक्ष बनले. हे सर्व एका परिवारातील आहेत का ? इंदिरा गांधींनंतर काँग्रेसने सांगावे की, एकजण असा जो गांधी परीवाराबाहेरचा पक्षाध्यक्ष बनू शकला का ? आणि हे लोक लोकशाहीची चर्चा करतात, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.


गृहमंत्री अमित शाह यांनी भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसी नेत्यांक़डून होणाऱ्या विधानांचा समाचार घेतला. या मुद्द्यावर आम्ही संसदेत चर्चा करण्यासाठी तयार आहोत, तिथे प्रश्न विचारा आम्ही उत्तर देऊ, १९६२ ते आत्तापर्यंत झालेल्या घटनाक्रमांवर दोन हात करू, असे आवाहन त्यांनी काँग्रेसला केले आहे. ज्यावेळी देश एक कठोर आणि मजबूत भूमिका घेऊ इच्छीत आहे, जवान सीमेवर लढत आहेत. त्यावेळी सोबत उभे राहण्याची गोष्ट सोडून पाकिस्तान आणि चीनला खूश करणारी विधाने करायला नको होती, असा टोला त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना लगावला.


सरकार भारताविरोधात काम करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी सक्षम आहे नेमकी हीच सल काँग्रेसींच्या मनात आहे. इतक्या मोठ्या पक्षाचे माजी अध्यक्ष असूनही राहुल गांधी अशाप्रकारचे राजकारण करतात. 'सरेंडर मोदी' या ट्विटबद्दल उल्लेख करताना राहुल गांधींनी स्वतःच याचा विचार करायला हवा, असे म्हटले. पाकिस्तान आणि चीनमध्ये त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर हॅशटॅगद्वारे व्हायरल केले जात होते. त्यांच्या वक्तव्यांमुळे चीन आणि पाकिस्तानला आनंद होत आहे. 


सरकार कोरोना विरोधात सक्षमपणे लढेल. राहुल गांधी गांधींना मी सल्ला देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षातील नेत्यांनी त्यांना सल्ला द्यावा. काही लोकांची वक्रदृष्टी असते, त्यामुळे त्यांना चूकीच्या गोष्टीही बरोबर दिसू लागतात. भारत कोरोनाशी योग्य पद्धतीने लढत आहे. भारतातील कोरोनाची आकडेवारी इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे, असेही ते म्हणाले.


 


 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121