डी-वॉर्डमधील उच्चभ्रू वस्तीत पुन्हा पसरतोय कोरोना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2020
Total Views |

south mumbai_1  



मलबार हिल, पेडर रोडसह ग्रँट रोडमध्ये पालिकेपुढे आव्हान; पाच दिवसांपासून सरासरी ५० रुग्णांची नोंद


मुंबई : पालिकेच्या ‘डी’ वॉर्डमध्ये जवळपास आटोक्यात आलेला कोरोना संसर्ग गेल्या चार -पाच दिवसांपासून पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये दररोज ३० ते ३५ च्या सरासरीने होणारी रुग्णवाढ आता मात्र सरासरी ५० वर पोहचली आहे. ही वाढ मलबार हिल, नेपियन्सी रोड, पेडर रोड, ब्रीचकँडी अशा उच्चभ्रू वस्त्यांमध्ये होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या विभागातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेसमोर आव्हान असणार आहे.


ग्रॅन्टरोड परिसरात आतापर्यंत २२०५ कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळले. यातील १५०० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डीस्चार्ज देण्यात आला आहे. येथे सुरुवातीपासून कोरोना नियंत्रणात होता. मात्र या परिसरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रुग्ण वाढले असल्याचे समोर आले आहे. ५ जूनपासून २० दिवसांत ५०० हून जास्त रुग्ण वाढले आहेत. यामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये काम करणार्‍या ड्रायव्हर, हाऊसकिपिंग कामगार, सिक्युरिटी गार्ड यांची संख्या १७० आहे. धारावी, मानखुर्दसह परराज्यातून आलेले काही कामगार यात समाविष्ट असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. प्रवास करून येताना या कामगारांना लागण होत आहे. मात्र पॉझिटिव्ह असूनही लक्षणे दिसत नसल्याने संपर्क वाढला व त्यामुळे संसर्गाचा फैलावत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.


दरम्यान, ग्रँटरोडमध्ये कोरोना रोखण्यासाठी ११ कंटेनमेंट झोन आहेत. तर १८४ इमारती आणि इमारतींचे भाग सील करण्यात आले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाते आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सोसायट्यांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक घेतली. या बैठकांमध्ये कोरोना रोखण्यासाठी आवश्यक खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या.
@@AUTHORINFO_V1@@