राज्यात पुढील दोन महिन्यांत वाढू शकतो कोरोनाग्रस्तांचा आकडा!

    दिनांक  27-Jun-2020 16:13:46
|

Rajesh tope_1  


आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती


पुणे : दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत वाढत चालले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत साधारण तीन ते साडे तीन हजार कोरोनाचे नवे रूग्ण एका दिवसाला सापडायचे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून आता हा आकडा पाच हजारापर्यंत गेला आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी कोरोनाग्रस्तांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली आहे.


जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढेल, अशी भीती राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे. रुग्णसंख्या वाढण्याची चिंता नाही, पण मृत्यूदर वाढू नये यावर आम्ही काम करतो आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.


मुंबईतली रुग्णसंख्या कमी होईल, पण मुंबई-पुण्यातून राज्यातल्या इतर भागात गेलेल्या काही संशयीत रुग्णांमुळे तिथे कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दुसरीकडे कोरोना संक्रमित रूग्णांसाठी सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कोरोना बाधित रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येईल. अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.