राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’ भोवती कोरोनाचा विळखा!

    दिनांक  27-Jun-2020 10:10:24
|
Krishnkunj_1  H

राज ठाकरेंच्या ७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशात लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात पुन्हा एकदा कोरोना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजपर्यंत दाखल झाला आहे.


त्यांच्या आणखी एका वाहन चालकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या एकूण ७ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजभोवती कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे दिसत आहे.


सर्वात आधी राज ठाकरे यांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांपैकी ३ सुरक्षा रक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर त्याचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजमध्ये घरकाम करणाऱ्या सेवकालाही कोरोनाचा संसर्ग झाला. यानंतर राज ठाकरे यांच्या दोन चालकांनाही कोरोनाची लागण झाली. आता पुन्हा एकदा आणखी एका चालकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यासह राज ठाकरेंच्या आजूबाजूला कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आता ७ पर्यंत गेली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.