चीनच्या सैन्याने लडाखमधील कारवाया बंद कराव्यात!

27 Jun 2020 18:29:41

china_1  H x W:


चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्री यांनी चीनला सुनावले खडे बोल!

नवी दिल्ली : बॉर्डरवर सैन्य वाढवण्याचा प्रयत्न केल्यास फक्त शांती प्रक्रीयेवरच परिणाम पडणार नाही, तर दोन्ही देशांचे संबंधही खराब होऊ शकतात, असा इशारा भारताने चीनला दिला आहे. पूर्व लडाखमधील कारवाया बंद कराव्यात असे चीनला सांगण्यात आले आहे. चीनमध्ये भारताचे राजदूत विक्रम मिस्री यांनी एका वृत्तसंस्थेशी शुक्रवारी केलेल्या बातचीतदरम्यान हे सांगितले.


मिस्री म्हणाले की, बॉर्डरवर चीनी सैनिकांमुळे दोन्ही देशांच्या संबंधावर वाईट वरिणाम पडला आहे. आता संपूर्ण जबाबदारी चीनची आहे की, त्यांना हे संबंध कसे ठेवायचे आहेत? चीनने भारतीय सैनिकांच्या नॉर्मल पेट्रोलिंगमध्ये अडथळा आणू नये.


मिस्री यांनी लद्दाखमध्ये गलवान व्हॅलीवर चीनच्या दाव्याचे खंडन केले. त्यांनी म्हटले की, अशा खोट्या गोष्टींमुळे चीनला काहीच फायदा होणार नाही. बॉर्डरवर आमच्याकडून ज्या कोणत्या अॅक्टीव्हिटीज होतात, त्या लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवर आमच्या सीमेत होतात. चीनला महत्वाच्या नसलेल्या अॅक्टिविटीज थांबवण्याची गरज नाही. हे चकित करणारे आहे की, ज्या सेक्टरमध्ये कधीच वाद झाला नाही, अशा ठिकाणीदेखील चीनने कारवाया केल्या.


तर, भारतातील चीनचे राजदूत सुन वेडॉन्ग यांनी गुरुवारी म्हटले होते की, बॉर्डरवर तणाव कमी करण्याची जबाबदारी भारताची आहे. यावर मिस्री म्हणाले, आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, आता सीमेवर जी परिस्थिती उद्भवली आहे, त्याला सर्वस्वी चीन जबाबदारी आहे. एप्रिल आणि मेमध्ये लडाखमध्ये एलएसीवर चीनच्या कारवाया वाढल्या होत्या, यामुळे आमच्या सैन्याला नॉर्मल पेट्रोलिंगमध्ये त्रास होत होता.
Powered By Sangraha 9.0