राज्यभरात मिळणार रुग्णांना त्वरित रुग्णवाहिका ; किरीट सोमय्यांच्या प्रयत्नांना यश

    दिनांक  27-Jun-2020 18:08:54
|

kirit sommaiyaa_1 &nमुंबई :
केवळ मुंबईकरांनाच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील जनतेला आपल्या आसपासच्या रुग्णसेवेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील रुग्णांना यापुढे त्वरित रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. कोविड रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळत नसून उपचाराअभावी त्यांचा मृत्यू होत असल्यानबाबत भाजपचे उपाध्यक्ष माजी खासदार किरीट सोमैया यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश राज्य सरकारकडून पाळण्यात आले आहेत. रुग्णवाहिकेची माहिती आणि रुग्णवाहिकेचे प्रत्येक जिल्ह्यातील दरही आता आरटीओच्या वेबसाईटवर उपलब्ध झाले आहेत. किरीट सोमय्या यांनी योग्यवेळी योग्य विषयासंदर्भात याचिका दाखल केल्याने न्यायाधीशांनी त्यांचे कौतुक केले आहे.
या याचिकेवरील सुनावणी आता पूर्ण झाली असून यापुढे मुंबईकरांनाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनतेला आपल्या आसपासच्या रुग्णसेवेची माहिती एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे.लॉकडाऊन शिथील केल्यानंतर सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले असून सध्या मुंबईत ७८० नोंदणीकृत रुग्णवाहिकांपैकी ७०० रुग्णवाहिका कार्यरत असल्याचे मुंबई महापालिकेचे वकील अनिल साखरे यांनी सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य सरकारतर्फे रुग्णवाहिकांची गरज असलेल्या रुग्णांवर प्रभावी उपाययोजना सुरू केल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी पूर्ण झाली आहे.यापुढे जर कोणत्याही खासगी रुग्णवाहिका चालकाने जर नकार दिला तर त्यासंदर्भात तक्रारही दाखल करता येणार आहे. सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने हे नमूद केले आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्य सरकारने आरटीओ वेबसाइटवरील डॅशबोर्ड कार्यरत ठेवले असून त्यावर रुग्णवाहिकेची यादी उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. https://transport.maharashtra.gov.इन या संकेत स्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.