भाजपच्या व्हर्च्युअल रॅलीसाठी ३० लाख नागरिकांची नोंदणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2020
Total Views |

virtual rally_1 &nbs



मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील पहिल्या वर्षातील महत्वपूर्ण कामांची माहिती देण्यासाठी उद्या (२८ जून) होणाऱ्या व्हर्च्युअल रॅलीत ३० लाख नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. उद्या संध्याकाळी ६.३० वाजता ही रॅली निघणार आहे. या रॅलीचे नेतृत्व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले वर्ष नुकतेच पूर्ण झाले आहे. या ऐतिहासिक ठरलेल्या वर्षातील यशस्वी झालेली महत्वपूर्ण कामे जनतेसमोर मांडण्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि देवेंद्र फडणवीस या व्हर्च्युअल रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. या रॅलीत मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, रॅलीचे संयोजक खासदार मनोज कोटक, प्रदेश प्रभारी सरोज पांडे, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हेदेखील या रॅलीत सहभागी होणार आहेत. भाजपचे मुंबई मुख्यालय, वसंत स्मृती, दादासाहेब फाळके मार्ग, दादर पूर्व येथे सायंकाळी ६.३० वाजता रॅली सुरू होईल. युट्युबवरून https://youtu.be/dGke97oBv1k लिंकवर या व्हर्च्युअल रॅलीत सहभागी होता येणार आहे.



यासंबंधी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या पाच वर्षात महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या पर्वत पहिल्या वर्षात काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सारे जग त्यांच्याकडे मोठ्या विश्वासाने पाहत आहे. ही भारतीयांसाठी गौरवाची बाब आहे. मोदींजींच्या मार्गदर्शनाखाली आपण कोविड विरोधातही ठामपणे उभे राहिलो. या सर्व कामांची माहिती देण्यासाठी व्हर्च्युअल रॅली हा अभिनव प्रकार आहे. या रॅलीत ३० लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. अजूनही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. या रॅलीचे आयोजक खासदार मनोज म्हणाले की, मुंबई आणि कोकणच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ केले आहे. या संधीचे सोने करत त्यांनी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. हे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याची ही वेळ आहे. व्हर्च्युअल रॅली हा नवीन उपक्रम आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि महाराष्ट्राचे गौरव देवेन्द्र फडणवीस सहभागी होणार आहेत. या रॅलीत आत्मनिर्भर भारत म्हणजे काय याबाबत माहिती दिली जाईल. तेव्हा या व्हर्च्युअल रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन कोटक यांनी केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@