धक्कादायक : अग्निशमन दलातील ११७ जवान कोरोनाबाधित!

27 Jun 2020 16:35:27

Frie_1  H x W:


कंटेन्मेंट झोनमध्ये फवारणी करणे बेततेय अग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवावर!


मुंबई : कंटेन्मेंट झोनमध्ये फवारणी करणे अग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवावर बेतत आहे. आतापर्यंत ११७ जनांनाना कोरोनाची बाधा पोहोचली असून, अजूनपर्यंत ७ जवान आणि १ सफाई कामगार असे आठजण मृत्युमुखी पडले आहेत.


रुग्णालयातून आतापर्यंत ८० जवान बरे होऊन घरी गेले आहेत. जवानांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढल्याने दलाच्या ३४ अग्निशमन केंद्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जवानांपैकी काही जण कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. कोरोनाला रोखण्यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये निर्जंतुकीकरणाचे काम जवानांवर सोपविले होते. मात्र ही फवारणी जवानांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या मुंबईत ७५६ कंटेन्मेंट झोन आहेत. सर्वाधिक कंटेन्मेंट झोन पूर्व आणि पश्चिम उपनगरात वाढत आहेत. शहरासह उपनगरात औषध फवारणी करताना अधिक जवान बाधित झाले आहेत. भायखळा येथील मुख्य अग्निशमन केंद्रातील क्वारंटाईन केंद्रात बाधित जवानांसाठी ३० खाटांची व्यवस्था केली आहे. मात्र कोरोनाबाधित जवानांची वाढती संख्या पाहता ही व्यवस्था अपुरी पडत असल्याचे दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0