विशेष ट्रेन वगळता १२ ऑगस्टपर्यंत लांब पल्ल्याच्या इतर गाड्या रद्द!

26 Jun 2020 12:34:25

Railway_1  H x


प्रवाशांना तिकिटांचा परतावा मिळणार

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसमुळे केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. यानंतर काही स्पेशल ट्रेन्स सुरु करत नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र रेल्वेची व्यवस्था सामान्य होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे रेल्वे मंत्रालयाने सर्व ट्रेन्स १२ ऑगस्टपर्यंत रद्द केल्या आहेत. यापूर्वी ३० जून पर्यंत ट्रेन्स रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र रेल्वेकडून सुरु असलेल्या १०० मार्गांवरील स्पेशल ट्रेन्स मात्र सध्या सुरुच राहतील.


दरम्यान १ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान रेल्वेच्या नेहमीच्या वेळापत्रकानुसार ज्या ट्रेन सध्या सुरु नाहीत त्यांची तिकीटे रद्द करण्यात करण्यात आली आहेत. या रद्द केलेल्या तिकिटांचा संपूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार आहे. लॉकडाऊनमध्ये १४ एप्रिलपर्यंत बुक झालेली तिकीटे रद्द करण्यात आली आहेत. मात्र विशेष ट्रेन सुरुच राहणार आहेत. शिवाय १२ ऑगस्टपर्यंत अधिक ट्रेन सुरुही होऊ शकतात. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वे पूर्वपदावर यायला अजून वेळ लागणार असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे.


प्रवाशी आपले तिकिट दाखवून तिकीट खिडकीवरुन आपला परतावा घेऊ शकतात. ऑनलाईन बुकिंग केलेल्या प्रवाशांच्या खात्यात परतावा रक्कम जमा होणार आहे. हा परतावा प्रवाशी आपल्या प्रवासाच्या तारखेपासून पुढील सहा महिन्यांपर्यंत घेऊ शकतात, असे देखील रेल्वे बोर्डाने सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0